World Hepatitis Day 2021 : जगात ३० सेकंदात एकाचा मृत्यू

hepatitis
hepatitisgoogle

नागपूर : कर्करोग आणि एड्‌सपेक्षाही हिपॅटायटिसच्या (World Hepatitis Day 2021) रुग्णांच्या प्रमाणात जगभरात वाढ होत आहे. प्रत्येक बारावी व्यक्ती ‘व्हायरल हिपॅटायटिस’ च्या विळख्यात सापडते. ‘सायलेंट किलर’ म्हणून हिपॅटायटिसची ओळख आहे. यकृतावर छुप्या पद्धतीने वार करणारा हा आजार असून दर ३० सेकंदात हिपॅटायटिसने (Hepatitis death toll) जगात एकाचा मृत्यू होतो. वर्षभरात ११ लक्ष नागरिक या आजाराचे बळी ठरतात. ‘हिपॅटायटिस-बी’ विकारावर लस उपलब्ध आहे तर ‘हिपॅटायटिस-सी’ वर वेळेत औषधोपचार केला तर आजार पूर्णतः बरा होतो. (World Hepatitis Day 2021 one patient died at every 30 seconds due to Hepatitis in world)

hepatitis
पूरग्रस्तांनी आरोग्याकडे करु नका दुर्लक्ष; घ्या 'ही' काळजी

हिपॅटायटिस अर्थात काविळ विषाणूंच्या प्रकारानुसार ए, बी, सी, डी, ई आणि जी असे सहा प्रकार आहेत. उघड्यावरील अन्न, दूषित पाण्यामुळे ए आणि ई प्रकारचा काविळ होण्याची शक्‍यता असते. काविळ म्हणजे लिव्हर (यकृत) ला येणारी सूज. या आजाराची अनेक कारणे आहेत. पण वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो अशी माहिती डॉ. प्रतीक पडोळे यांनी दिली. बोलीभाषेत काविळला हळद्या, पंडू रोग असेही म्हणतात.

भारतात एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के नागरिक या आजाराने ग्रस्त आहेत. रक्तचाचणीनंतर काविळचे त्वरित निदान होते. संसर्ग झालेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास, लैगिंक आजार झालेली व्यक्ती, समलैंगिक संबंध असणाऱ्यांना, सुया, सिरींज किंवा इतर औषधातून इंजेक्‍शन साधने यांचा एकमेकांमध्ये वापर केल्यास, संसर्ग झालेल्या मातेकडून जन्माला आलेले नवजात बाळ, रक्ताच्या सान्निध्यात काम करणाऱ्या व्यक्तींना होण्याची दाट शक्‍यता असते.

काविळची लक्षणे -

  • भूक न लागणे

  • ताप, थकवा

  • मळमळ, उलट्या होणे

  • पोटात दुखणे, गडद रंगाची लघवी

  • मातीच्या रंगासारखे शौच होणे

  • सांधे दुखणे, त्वचेच्या, डोळ्याचा रंग पिवळा पडणे

वैद्यकीय क्षेत्रात सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा हिपॅटायटीस सी आहे. या आजाराचा संसर्ग झाल्यानंतरही त्याची कोणतीही विशिष्ट लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. या संसर्गावर वेळेत निदान होऊन उपचार न झाल्यास यकृतावर परिणाम होतो. कोविड संसर्गकाळात हिपॅटायटिसकडे दुर्लक्ष करू नका.
-डॉ. प्रतीक पडोळे, पचन व यकृतविकार तज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com