मुलींना १० व्या वर्षी का येते मासिक पाळी?

'प्रिकॉशियस प्युबर्टी' म्हणजे काय?
मुलींना १० व्या वर्षी का येते मासिक पाळी?

मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला आलेली सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीरातील इतर अवयवांचं ज्या पद्धतीने काम चालतं त्याचप्रमाणे मासिक पाळीचंही काम सुरु असतं. याच मासिक पाळीमुळे स्त्रीला आई होण्याचं सौख्य लाभतं. त्यामुळे या मासिक पाळीला अशुभ किंवा वाईट समजणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणूनच, या दिवसाविषयी स्त्रियांमध्ये, समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन (world period hygiene day) साजरा केला जातो. (world-period-hygiene day-precocious-puberty-symptoms-causes)

जवळपास ८०० दशलक्षपेक्षा जास्त स्त्रिया व मुलींना पाळी येते. मात्र, अजूनही अनेक स्त्रियांमध्ये मासिक पाळीविषयी गैरसमज आहे. त्यातच कोविड-१९ च्या काळात तर या गैरसमजामध्ये आणखीनच भर पडली आहे. आजही अनेक स्त्रिया, मुलींना मासिक पाळीच्या काळात बाजूला बसवलं जातं. परंतु, या काळात असा दुजाभाव करण्यापेक्षा त्यांना या दिवसाचं महत्त्व व त्या काळात कोणती काळजी घ्यावी हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, आज आपण मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी ते जाणून घेऊयात.

मुलींना १० व्या वर्षी का येते मासिक पाळी?
#PCOS : चेहऱ्यावर पुरळ येतंय?  जाणून घ्या पीसीओएसची लक्षणं

बऱ्याच स्त्रिया अजूनही पॅडऐवजी कापड वापरण्यावर भर देतात. परंतु, कापडाचा वापर केल्यामुळे योनी मार्गामध्ये जंतूसंसर्ग वाढण्याची भीती असते. याला व्हजायनल इनफेक्शन असं म्हणतात. जागतिक पातळीवर युएसएआयडीएस (युनायटेड स्टेट्स एजेन्सी फॉर इंटरनॅशल डेव्हलमेंट) सारख्या ब-याच संस्था स्त्रियांच्या आरोग्याविषयी तसेच पाळीविषयी आणि त्याच्या जागरुकतेविषयी कार्यरत आहे. शाळेमध्ये तसेच स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना पुरेशी जागा, स्वच्छ स्वच्छतागृह तसेच पाणी हे मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे आहे.

वयोमानानुसार, तसेच वजनामध्ये बदल झाला किंवा शरीरात काही रासानिक बदल झाल्यावरही पाळीवर त्याचा परिणाम होतो. साधारणपणे पाळी वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापर्यंत सुरु होते. काही प्रकरणांमध्ये वयाच्या दहाव्या वर्षी देखील पाळी येऊ शकते त्याला 'प्रिकॉशियस प्युबर्टी' म्हणतात. सोळा वर्षांनंतर जेव्हा पाळी सुरु होते त्याला 'डिलेड प्युबर्टी' असे म्हणतात. जसे वय वाढते तसे पाळीतही बदल होतात. पाळी साधारण वयाच्या ४७ वर्षापर्यंत जाते त्याला मेनोपॉज म्हणतात.

जर पाळी ५० वर्षे वयापर्यंत गेली तर त्या डिलेड मेनोप़ॉज म्हणतात. जर पाळी ५० वर्षे वयापर्यंतही गेली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. तसेच पाळी जर वयाच्या दहा वर्षाच्या आतच आली, तिथेही वेळीच स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते.

अलिकडे मुलींना वयाच्या ११ ते १२ व्या वर्षी पाळी येते आणि त्यांना शाळेमध्ये किंवा घरामध्येही पाळीविषयी माहिती दिले जाणे अतिशय गरजेचे आहे. त्यांना पाळीविषयी व त्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखायची, काय काळजी घ्यायची यासंदर्भातही ज्ञान देणे गरजेचे आहे.

आधीच्या स्त्रिया किंवा अजूनही खेडेगावात पाळीमध्ये कापड वापरले जात होते त्यानंतर पॅडचा शोध लागला. आता नवीन शास्त्राप्रमाणे पाळीसाठी मेंस्टुअल कप चा शोध लागला आहे. याचा वापर परदेशातही सहज केला जात आहे आणि जागतिक पातळीवर घेतलेल्या आढाव्यानुसार, असे समोर आले की कापड आणि पॅड पेक्षाही मेन्सटुल कप्स अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये पाळीमध्ये होणा-या इनफेक्शनचे प्रमाणही कमी आहे.

मासिक पाळीमध्ये कोणत्या खबरदारी घ्याव्यात

१. कापड न वापरता नेहमी पॅडचा वापर करावा.

२. प्रत्येक पॅड ६ ते ८ तासांनी बदला. दिवसभर एकच पॅड वापरु नका.

३. वापरलेले पॅड नीट पेपरमध्ये गुंडाळून बंद कचरापेटीत टाकावे.

४. या दिवसात योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी वापरणारे केमिकल टाळावे.

५. पुरेशी विश्रांती आणि झोप घ्यावी.

६. मीठ, साखर, कॉफी, दारु, तिखट पदार्थ शक्यतो टाळावे.

७. मुबलक प्रमाणात पाणी, फळे, पालेभाज्या, आलं, हळद, बदाम, काजू तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

(डॉ. आदिती जाधव या साताऱ्यातील सनराईज हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com