क्षयरोगाचा त्रास होतोय? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

WHO च्या मते टीबी हा एक धोकादायक आजार आहे.
World Tuberculosis Day
World Tuberculosis Day esakal
Summary

WHO च्या मते टीबी हा एक धोकादायक आजार आहे.

दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन (World Tuberculosis Day) साजरा केला जातो. या दिवशी खासकरून अनेक मोहिमा चालवल्या जातात. सगळ्यांना या आजाराची अधिकाधिक माहिती मिळावी म्हणून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. टीबी (TB) हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. जगभरात एका दिवसात चार हजारहून अधिक लोक या आजाराने दगावतात.

World Tuberculosis Day
Oral Health: मौखिक आरोग्य सांभाळा, पचनसंस्थेतील आजार टाळा

दरवर्षी या दिवशी एक थीम ठेवली जाते. ''Invest to End TB' अशी यंदाची संकल्पना आहे. 'Save Lives' ठेवण्यात आले आहे. यू.एस. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कोच यांनी टीबीसाठी जबाबदार असलेल्या सूक्ष्म जीवाणूंचा प्रथम शोध लावला. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरातील लोकांना या श्वसन रोगाबद्दल जागरूक करणे.

WHO च्या मते टीबी हा एक धोकादायक आजार (Disease) आहे. अशा परिस्थितीत 2030 पर्यंत या जीवघेण्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय जगाने ठेवले आहे. त्याचबरोबर 2025 पर्यंत हे लक्ष्य जिंकण्याचा निर्धार भारताने केला आहे.

World Tuberculosis Day
लाखात एकाला होतात 'हे' दुर्मिळ आजार

यूपीत टीबीचे सर्वाधिक रुग्ण

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर या राज्यात टीबीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील प्रत्येक पाचवा रुग्ण यूपीचा आहे. जाणून घेऊयात, क्षयरोगाच्या रुग्णांवरील उपचारासाठी दरमहा 500 रुपये मोफत व मोफत औषधे तसेच चांगल्या अन्नासाठी देण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असलेले रुग्णही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, मात्र त्यानंतरही टीबीच्या रुग्णांचा शोध घेऊन हा आजार समूळ नष्ट करणे हे राज्यापुढील आव्हानच आहे.

टीबीचे जीवाणू श्वासाने शरीरात प्रवेश करतात. रुग्णाचा खोकला, बोलणे, शिंकणे, थुंकणे यामुळे इतर लोकांमध्ये संसर्ग पसरू शकतो. अशावेळी टीबी पेशंटच्या तोंडावर नेहमी रुमाल किंवा मास्क लावावा. शुद्ध व पौष्टिक आहार, वेळेवर योग्य औषधोपचार हे टीबीच्या पेशंटसाठी आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com