World TB Day : टीबी बरा होऊ शकतो घ्या ही काळजी...

मुझफ्फर खान
मंगळवार, 24 मार्च 2020

खोकल्यावाटे तोंडातील जंतूंचा हवेद्वारे संसर्ग होऊन टीबी (क्षयरोग) होण्याची शक्यता असते. रस्त्याने येता-जाता थुंकत असाल तर तुमच्या थुंकण्यातून इतरांना टीबीचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

चिपळूण (रत्नागिरी) : खोकल्यावाटे तोंडातील जंतूंचा हवेद्वारे संसर्ग होऊन टीबी (क्षयरोग) होण्याची शक्यता असते. रस्त्याने येता-जाता थुंकत असाल तर तुमच्या थुंकण्यातून इतरांना टीबीचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. थुंकीतील जंतूच्या संसर्गामुळे टीबीचा प्रसार वाढतो. स्वयंशिस्त पाळून क्षयरोग नियंत्रणात आणणे शक्य आहे. अशी माहिती डॉ. संतोष ढगे यांनी ‘सकाळ’ला दिली. 

मंगळवारी जागतिक टीबी दिन पाळण्यात येत आहे. त्यानिमित्ताने डॉ. ढगे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, टीबीच्या आजाराकडे दुर्लक्ष होत आहे. ’रस्त्यावर थुंकल्याने टीबीचे जंतू हवेत तरंगतात. ते सुमारे 5 ते 7 दिवस हवेत तरंगत राहतात. त्या दरम्यान हे जंतू हवेतून श्वासाद्वारे फुफ्फुसात जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे टीबी होऊ शकतो. सध्या टीबी होण्याची विविध कारणे असली तरी रस्त्यावर थुंकल्याने त्यातून टीबीचा प्रसार होण्याचे कारण महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकणे थांबविले पाहिजे.

हेही वाचा- बाबांनो तब्येतीची काळजी घ्या...

शरीराच्या विविध भागांमध्ये टीबीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. फुफ्फुस वगळता अन्य भागांमध्ये झालेल्या टीबीच्या प्रकाराला ’एक्स्ट्रा पल्मनरी टीबी’ असे म्हणतात. तर, फुफ्फुसाच्या टीबी प्रकाराला ’पल्मनरी टीबी’ असे म्हटले जाते. रस्त्यावर थुंकल्याने होणार्‍या टीबीचे प्रकार वाढत असून, त्याचे प्रमाण किती आहे हे सांगणे शक्य नाही पण स्वयंशिस्त पाळली पाहिजे. 

 हेही वाचा- ‘त्या’ नेपाळी बाबूंना अखेर काढले शोधून....

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे थांबविले पाहिजे.
एका टीबी रुग्णामुळे 10 जणांना संसर्ग होतो. प्रत्येकाला संसर्गामुळे टीबी होतोच असे नाही. पण त्यातील एकाला संसर्ग होऊन टीबी होऊ शकतो. योग्य औषधोपचार घेतला तर टीबीचा रूग्ण बरा होऊ शकतो. सध्या उपलब्ध तंत्रज्ञानासह निदानाच्या पद्धतीमुळे, जनजागृतीमुळे टीबीचे निदान होत आहे. अनेकदा टीबीचे उपचार घेऊन आजार बरा झाल्याचे वाटल्यास औषधे घेणे बंद केले जाते. त्यामुळे एमडीआर, एक्सडीआर टीबी वाढत आहे. नागरिकांनी टीबी झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. औषधोपचार पूर्ण करावीत. त्यामुळे टीबीला रोखता येणे शक्य आहे.’

 हेही वाचा- होम क्वारंटाईनचा शिक्का मारताना डॉक्‍टरच गेले पळून....

टीबी रोखण्यासाठी उपाय

खोकला आल्यास तोंडावर रुमाल ठेवावा.
घरात टीबीचा रुग्ण असल्यास घर दररोज स्वच्छ करावे. त्याचा इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. 
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकू नये.
प्रतिकार शक्ती वाढवावी. 
कोवळ्या उनात रोज व्यायाम करावा.
तळलेले पदार्थ खाणे टाळावे. 
नेहमी पारंपारिक आहार घ्यावा

टीबी हा संसर्गजन्य आजारापैकी एक.

सध्या फुफ्फुसाचा आणि शरीरातील इतर भागांमध्ये होणार्‍या टीबीचे प्रमाण सारखेच आहे. टीबीचे उपचार व्यवस्थित न घेतल्यामुळे होणार्‍या एमडीआर टीबीचे प्रमाण अधिक आहे. केंद्र सरकारने त्याला प्रतिबंध करणारी औषधे उपलब्धता केली आहे. परिणामी, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर नागरिकांनी थुंकू नये. हा आजार नियंत्रित करणे आपल्याच हातात आहे.

 

.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World TB Day information in tb condition kokan marathi news