कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा 4 घरगुती उपाय

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 27 September 2020

सध्या कोरोनामुळे सर्वजण आरोग्याकडे पहिल्यापेक्षा जास्त लक्ष देताना दिसत आहेत. सॅनिटायझरचा उपयोग सर्वांच्या दैनंदिन जिवणातील आवश्यक भाग झाला आहे.

पुणे: सध्या कोरोनामुळे सर्वजण आरोग्याकडे पहिल्यापेक्षा जास्त लक्ष देताना दिसत आहेत. सॅनिटायझरचा उपयोग सर्वांच्या दैनंदिन जिवनातील आवश्यक भाग झाला आहे. वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे प्रत्येकाला चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीची (Immune System) गरज आहे.

रोगप्रतिकारक क्षमता (Ways To Increase Immunity) चांगली असेल तर कोणत्याही व्हायरस अथवा बॅक्टेरिया शरीरावर लगेच आक्रमण करू शकत नाही, आपल्यातील प्रतिकार क्षमता त्यास विरोध करते. यामुळे कोणत्याही रोगापासून दूर रहायचं असेल तर सर्वांनी स्वतःची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. जर एखाद्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल तर त्याला रोगाची लगेच होते तसेच तो कमी रोग प्रतिकारक क्षमता (Weak Immune System) असल्याने त्यातून सावरूही शकत नाही. 

वजन कमी करायचं आहे ? यावेळेत एक्सरसाइज केल्यास होईल वजन कमी

यामुळे सर्वांनी रोगप्रतिकार क्षमता कशी वाढेल यावर लक्ष दिलं पाहिजे. यासाठी बऱ्याच नैसर्गिक पध्दती वापरून तुम्ही रोगप्रतिकारक क्षमता चांगली (Strong Immune System) करू शकता. यासाठी (4  effective Ways To Strengthen The Immune System) चार पध्दतीने आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवू शकतो.   

1. पौष्टिक पदार्थांचा जेवणात सामावेश-  बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. जास्तीत जास्त घरी बनवलेले अन्न खाल्ले पाहिजे. आहारात त्या-त्या मोसमातील पालेभाज्या आणि सामावेश केला पाहिजे. आहारात सुकामेवा, कडधान्ये, डाळी आणि पालेभाज्यांचा सामावेश करावा.

2. व्यायाम- नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी उत्तम ठरतं. रोज निदान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे, यामुळे आपण नेहमी ताजेतवाने राहतो. दिवसभर स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी प्राणायम, श्वसनाचे व्यायाम, योगासने, चालने तसेच शक्य असेल तर पायऱ्या चढणे यासारख्या व्यायाम केला पाहिजे.

 PCOD आजारावर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान, हार्मोनल असंतुलन नियमित करण्यात मदत

3. पुरेशी झोप घ्या- झोप जर पुरेशी होत असेल तर आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली राहते. सायंकाळी 4 नंतर शक्यतो कॅफेन घेणं टाळलं पाहिजे. झोपण्यापुर्वी एक कप हळद घातलेलं दुध घेतलं पाहिजे. तसेच  आपण जिथं झोपणार आहोत ती जागा आरामदायक असली पाहिजे.  

4. तणावाचं योग्य नियोजन केलं पाहिजे- जास्त तणाव घेणं टाळलं पाहिजे. तणावाने झोप मोड होणे, पचनसंस्था बिघडणे आणि वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. या कारणाने आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you can increase and Strengthen The Immune System by 4 ways