सतत अपचनाचा त्रास होत असल्यास करू नका दुर्लक्ष; हे असू शकतं 'या' समस्यांचं लक्षण 

stoamach ache
stoamach ache

नागपूर : अधिक काळ उपाशी राहाणं जसं वाईट आहे तसंच अधिक प्रमाणात खाणंही वाईट आहे. आजकाल अनेक जण जंक फूड किंवा तेलकट वस्तू खातात. त्यामुळे त्यांना अपचनाचा त्रास नेहमीच होत असतो. मात्र अपचनाचा त्रास होणे, पोट वारंवार दुखणे अशा काही समस्यांना आपण गंभीर मानत नाही. या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र हा त्रास वारंवार होण्यामागे काही गंभीर आजार दडलेले असू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत. 

गॅस्ट्रोएन्टेरिटिस

ज्यांना ताप, उलट्या, डोकेदुखी किंवा अतिसारसारख्या आजारांचा त्रास वारंवार होत असेल. तर आपल्यास पोट फ्लू (गॅस्ट्रोएन्टेरिटिस) होण्याचा धोका असू शकतो. जो आपल्या पोटातील व्हायरल किंवा अगदी बॅक्टेरिया असू शकतो. कोणत्याही व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुले तुम्हाला हा आजार होऊ शकतो.. म्हणूनच यापासून बचाव करण्यासाठी सतत हात स्वच्छ धुवत राहा. सतत पाणी पित राहा. जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. 

गॅस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्स रोग (जीईआरडी)

यामुळे तुम्हाला हार्ट बर्नचा त्रास होऊ शकतो. आपण ग्रहण केलेलं अन्नपचन होण्यासाठी एसोफेजियल स्फिंक्टर हे कारणीभूत असतं. जेव्हा हे कमजोर होतं तेव्हा आपल्याला ॲसिडीटीचा त्रास होतो.  तसंच हार्ट बर्नचा तास होऊ शकतो. यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स, चीज किंवा दुग्धजन्य पदार्थांसारखे अम्लीय पदार्थ खाऊ नका, आपले अन्न व्यवस्थित चावून घ्या, तसंच आपले डोके उंच ठेवा आणि झोपा. 

अल्सर आणि गॅस्ट्रिटिस

तुमच्या पोटाच्या समस्यांना अल्सर किंवा गॅस्ट्रिटिस हे दोन रोग कारणीभूत असू शकतात. गॅस्ट्रिटिसमध्ये तुमच्या पोटाच्या आतमध्ये सूज येऊ शकते. जर या समस्या असतील तर पोट दुखणं, अपचनसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच यामध्ये विष्ठेतून रक्त येणं, विष्ठा काळ्या रानगाची असणं हे लक्षणं असतील तर उपाय एकच तो म्हणजे आपल्या डॉक्टरांना जाऊन भेट आणि औषध सुरु करा. 

बद्धकोष्ठता

जर तुम्हाला नेहमी विष्ठेदरम्यान त्रास होत असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेच त्रास असू शकतो. तसंच आहारात फायबरचा अभाव बद्धकोष्ठता निर्माण करू शकतो. आतड्यांच्या हालचाली दरम्यान ताणतणाव असताना आपल्याला बद्धकोष्ठता असल्याचे आपल्याला आढळेल. बरेच द्रवपदार्थ पिणे, फायबर युक्त पदार्थ खाणे जसे की बेरी, ब्रोकोली, संपूर्ण धान्य, बटाटे आणि सफरचंद यापासून तुमचा बचाव करू शकतात.  

मूळव्याध 

जर तुम्हाला विषेदरम्यान रक्त येत असेल किंवा प्रातर्विधीदरम्यान त्रास होत असेल तर हे मूळव्याध असण्याचं लक्षण असं शकतं. मूळव्याध असणाऱ्या लोकांना अति भयंकर त्रास होतो. तसंच उठता बसता येत नाही. त्यामुळे यासाठी दररोज आंघोळ करणं, फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. तसंच डॉक्टरांचा सल्ला घेणंही महत्वाचं आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com