Groundbreaking Gene Therapy : अवघ्या दीड वर्षांच्या कर्णबधीर चिमुकलीची श्रवणक्षमता आली परत; 'जीन थेरपी' मुळे घडला चमत्कार.!

Groundbreaking Gene Therapy : जन्मत:च कर्णबधीर असलेल्या व्यक्तींना ऐकू येण्याची क्षमता बहाल करण्यासाठी जगभरात अथक प्रयत्न केले जात आहेत.
Groundbreaking Gene Therapy
Groundbreaking Gene Therapyesakal

Groundbreaking Gene Therapy : मागील काही वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात बहिरेपणावर सखोल संशोधन करण्यात येत आहे. जन्मत:च कर्णबधीर असलेल्या व्यक्तींना ऐकू येण्याची क्षमता बहाल करण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. आता या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळाल्याचे चित्र आहे.

त्याचे कारण म्हणजे नुकतीच १८ महिन्यांची एक ब्रिटिश मुलगी जी पूर्णपणे कर्णबधीर म्हणून जन्माला आली होती. ती आता नव्या जीन थेरपीनंतर बरी झाली आहे. ही थेरपी यशस्वी झाल्यामुळे तिला आता ऐकू येत आहे. या चिमुकलीचे नाव ओपल असे आहे. या जीन थेरपीच्या माध्यमातून ऐकण्याची क्षमता परत मिळालेली ती आता सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरल्याचे सांगितले जात आहे.

Groundbreaking Gene Therapy
Health Care : अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने मृत्यूचा धोका लवकर वाढतो; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

चीन आणि संयुक्त अमेरिकेसह जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांची टीम अनुवांशिक बहिरेपणा दूर करण्यासाठी आणि ऐकू येण्याची क्षमता व्यक्तीला परत मिळवून देण्यासाठी विविध उपचारांची चाचणी घेत आहेत.

ब्रिटिश कान शल्यचिकित्सक मनोहर बॅन्स म्हणाले की, ओपल ही अमेरिकन बायोटेक फर्म रेजेनरॉनद्वारे विकसित थेरपी घेणारी जगातील पहिलीच व्यक्ती ठरली आहे आणि आम्हाला माहित आहे की, जागतिक स्तरावर ही थेरपी घेणारी ती सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे.

केंब्रिजमधील ॲडेनब्रुक हॉस्पिटलमध्ये ओपलवर उपचार करण्यात आले. ओपलच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना बॅन्स म्हणाले की, तिच्यावर झालेली शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली असून ती आता सामान्य श्रवण क्षमतेच्या अगदी जवळ पोहचली आहे.

त्यामुळे, आम्हाला आशा आहे की, ही एक संभाव्य उपचार पद्धत असू शकते. ते पुढे म्हणाले की, अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांनंतर हे यश आले आहे. ‘बहिरेपणाच्या उपचारांमधील हा एक नवीन अध्याय’ आहे.

दक्षिण मध्य इंग्लंडमधील ऑक्सफोर्डशायरमधील या लहान मुलीला जन्मत:च अनुवंशिक श्रवणविषयक न्यूरोपॅथीशी संबंधित समस्या होती. जी कानाच्या आतील बाजूकडून मेंदूकडे जाणाऱ्या मज्जातंतूंच्या आवेगाच्या व्यत्ययामुळे होते. ज्यामुळे व्यक्तीला ऐकू येत नाही.

ही समस्या दूर करण्यासाठी रेजेनरॉनची नव्या युगातील जीन थेरपी कानामध्ये जनुकाची कार्यरत प्रत वितरीत करण्याचे काम करते. बॅन्स पुढे म्हणाले की, मागील वर्षातील सप्टेंबरमध्ये ओपलवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आता तिची श्रवण क्षमता सामान्य श्रवण क्षमतेच्या अगदी जवळ पोहचली आहे. शिवाय, त्यात आणखी सुधारणा होण्याची आशा आहे.

Groundbreaking Gene Therapy
Healthy Diet: पौष्टिक पदार्थांचा अभाव हे अनेक आजारांचं कारण; ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं कशी असावी रोजची थाळी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com