अमेरिकेतील १०० वर्षीय नागरिकांनी उलगडले दीर्घायुष्याचे रहस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

100 years old lady

अमेरिकेतील १०० वर्षीय नागरिकांनी उलगडले दीर्घायुष्याचे रहस्य

मुंबई : सुदृढ आणि दीर्घ आयुष्य प्रत्येकालाच जगायचं असतं. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात; मात्र काही प्राथमिक नियम पाळले नाहीत तर या प्रयत्नांचा काहीही उपयोग नसतो. जुन्या पिढीतील लोक कळत-नकळतपणे हे नियम पाळत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पिढीत १०० वर्षे आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींचीही उदाहरणे आढळतात.

हेही वाचा: उष्णतेची लाट, आहार आणि आरोग्य

२०२१ साली ७० हजारांपेक्षा अधिक अमेरिकी नागरिकांनी आपल्या १०० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या आहाराचे रहस्य उलगडले. त्यांच्या आहाराविषयी करण्यात आलेल्या अभ्यासातून खाण्या-पिण्याच्या कोणत्या सवयी माणसाला शंभरीपर्यंत नेतात हे स्पष्ट झाले.

कोणत्या आहेत या सवयी ?

आहारात सोयाबीनचा जास्तीत जास्त समावेश असायला हवा. तसेच खाताना जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे पोट ८० टक्के भरले आहे तेव्हा खाणे थांबवा. यामुळे वजन आटोक्यात राहील. अन्यथा वजन वाढल्यास विविध आजार उद्भवू शकतात.

दिवस संपत येतो तसतसे मानवी शरीराला कमी ऊर्जेची गरज असते. याउलट दिवसाच्या सुरुवातीला जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे सकाळ आणि दुपारचा आहार भरगच्च असावा. रात्रीचा आहार कमी असावा. रात्री उशिरा काहीही खाऊ नये.

हेही वाचा: हेल्दी डाएट : उन्हाळ्यासाठी भारतीय आहार

तुमच्या आहारात कमी पदार्थांचा समावेश असेल तरीही चालेल; मात्र ते पौष्टिक असावेत. मांस खाण्यापेक्षा हिरव्या पाल्याचा आहार घेतल्यास शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे मांसाचे कमीत कमी सेवन करावे.

Web Title: 100 Years Old People Reveal The Secret Of Their Long Healthy Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Age
go to top