
Health risks of eating fried foods for breakfast
Sakal
सकाळच्या नाश्त्यात योग्य पदार्थांचा समावेश करावा.
चुकीचे पदार्थ खाल्यास कोलेस्टेरॉल वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.
त्यामुळे दिवसभर थकवा आणि कमी ऊर्जा वाटू शकते.
Unhealthy breakfast foods causing health problems: सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा असतो. कारण तो आपल्याला दिवसभराच्या कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करतो. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर, जेव्हा आपण संतुलित आणि पौष्टिक नाश्ता करतो तेव्हा केवळ पचनसंस्था सक्रिय होत नाही तर मेंदू देखील जलद काम करतो. निरोगी नाश्ता शारीरिक आरोग्य तसेच मानसिक लक्ष केंद्रित करणे आणि मूड सुधारतो. परंतु अनेकदा लोक घाई किंवा चवीमुळे नाश्त्यात अशा गोष्टी खातात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. याबाबत डॉ. सलीम झेदी यांनी सोशलमिडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.