Weight Loss Drink : नो डायटिंग, नो जिम! हे 8 मार्गिंग ड्रिक बेली फॅट झपाट्याने करेल बर्न

मॉर्निंग रूटीनचा तुमच्या आरोग्यावर चांगलाच प्रभाव पडतो. तेव्हा सकळी काय खावे-प्यावे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचेच
Weight Loss Drink
Weight Loss Drinkesakal

Weight Loss Drink : बहुतांश लोक बेली फॅट बर्न करण्यासाठी कालावधी सेट करतात. आणि तेवढ्या काळात बेली फॅट कमी झाले नाही तर निराशही होतात. वजन कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनात काही बदल करणे गरजेचे आहे. तुमच्या मॉर्निंग रूटीनचा तुमच्या आरोग्यावर चांगलाच प्रभाव पडतो. तेव्हा सकळी काय खावे-प्यावे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचेच.

सकाळच्या या मॉर्निंग ड्रिंक बेली फॅट बर्न करेल

TOI च्या रिपोर्टनुसार, सकाळच्या वेळी एक ग्लास लिंबू पाणी मेटाबोलिझम वाढवण्यासाठी पुरेसे आहे. यामुळे शरीरा हायड्रेट राहते आणि व्हिटॅमिन सी सुद्धा मिळते. हे तुमच्या इम्युन सिस्टिमला बूस्ट करून फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या डॅमेजपासून तुमचा बचाव करते.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे तुमचा मेटाबोलिझम वाढवण्याबरोबरच वेट मेंटेन करण्यासही मदत करतात. शिवाय ग्रीन टीमुळे ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते.

Weight Loss Drink
Weight Loss Drink

ब्लॅक कॉफी

ब्लॅक कॉफी ही एक लो कॅलरी ड्रिंक आहे. ज्यात कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. कॅफिन मेटाबोलिझम वाढवण्यास आणि फॅट बर्निंगच्या प्रक्रियेला वेग देते. शिवाय अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलच्या डॅमेजपासूनही तुमचा बचाव करते.

Weight Loss Drink
Weight Loss Drink

दालचिनीचा चहा

जर तुम्हाला रोजचा चहा पिण्याचा कंटाळा आला असेल तर दालचिनीचा चहा पिण्यास सुरुवात करा. हा चहा रक्तातील साखर नियंत्रित करते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करते. हा चहा प्यायल्याने पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जे पोटाची चरबी कमी करण्यास देखील मदत करते.

Weight Loss Drink
Weight Loss Drink

अॅलोव्हेरा ज्यूस

जर तुम्ही लठ्ठपणा, आयबीएस, उच्च रक्तातील साखर, कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीने त्रस्त असाल तर सकाळी अॅलोव्हेरा ज्यूस पिणे चांगले. हा ज्यूस या सर्व समस्या दूर करत असला तरी तो जास्त प्रमाणात पिऊ नका. (Lifestyle)

Weight Loss Drink
Weight Loss Drink

चिया सीड्सचे पाणी

वजन कमी करण्यासोबतच प्रोटीन घेणेही महत्त्वाचे आहे. चिया सीड्स खाल्ल्याने भूक कमी लागते आणि वजन लवकर कमी होते. चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने तुम्हाला प्रोटीन मिळते आणि ते फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे आवश्यक पोषक तत्व देखील प्रदान करते. (Weight Loss Drink)

Weight Loss Drink
Weight Loss Drink

हळद आणि काळ्या मिऱ्याचे पाणी

हळद आणि काळी मिरी तुमच्या घरात सहज उपलब्ध होईल. हळद कर्क्यूमिनयुक्त असते, जे जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर काळी मिरी मेटाबॉलिझम वाढवून फॅट बर्न करण्याचे काम करते. हे दोन्हींचे एकत्र सेवन केल्यास वजन लवकर कमी होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com