
कॅन्सर हा दुर्गम आजार असून हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. जगात वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आढळून येतात. आतापर्यंत कॅन्सरवर मात करण्यासाठी योग्य औषध उपलब्ध नसल्याने अनेकजण कॅन्सरला घाबरतात मात्र आता कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही कारण अमेरीकेने अशा एका ड्रग्जचा शोध लावलाय जो शंभर टक्के कॅन्सरवर मात करू शकणार. या औषधच्या मदतीने कॅन्सरचे ट्युमर्स आपण नष्ट करू शकतो. (a drug for cancer treatment has shown 100 percent success in removing the tumours)
या औषधच्या मदतीने अमेरिकेने एकावेळी १८ जण कॅन्सरमुक्त केल्याचा दावा केलाय. Dostarlimab- हे अंटी कैन्सर औषधाचे नाव आहे
अमेरीकेतील मेमोरीअल स्लोन केटरींग कॅन्सर सेंटर येथे हा ट्रायल करण्यात आला. Dostarlimab हे औषध 18 रुग्णांना देण्यात आले. या औषधामुळे कॅन्सरचा ट्युमर पूर्णपणे नष्ट करण्यात आलाय तर या औषधीचा कालावधीसुद्धा निश्चित करण्यात आला असून सहा महिन्यासाठी हे औषध असणार आहे.
विशेष म्हणजे हा ट्रायल कॅन्सर पेशंटसाठी एक उमेद घेऊन आला असून सध्या या औषधाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या औषधीच्या मदतीने कोणत्याही प्रकारच्या केमोथेरीपी, सेशन किंवा सर्जरीशिवाय कॅन्सरवर मात करता येणार. या औषधांच्या ट्रायल मध्ये सहा महिने हे औषध कॅन्सर पेशंटला देण्यात आले त्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तर त्यांनी त्यावेळी कॅन्सरवर मात केलेली होती.
तुम्ही जर हे औषध खरेदी करण्याचा विचार कराल तर भारतीय चलनानुसार या औषधाची किंमत अंदाजे 8.55 लाख रुपये आहे. जवळपास साडे आठ लाख रुपयांची ही औषध जरी महाग वाटत असली तरी कॅन्सरवर निदान मिळणे हीच खुप मोठी गोष्ट म्हणता येईल. या औषधीला जर मान्यता मिळाली तर जगभरातील लाखो कॅन्सर पेशंटसाठी हे आशेचं किरण ठरणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.