Pregnancy Diet : पहिल्या 3 महिन्यांत असा असावा डाएट; अभिनेत्रीनं शेअर केला खास प्रेग्नेंसी डाएट प्लान

महिला गर्भवती असताना तिच्या आरोग्याकडे तिला फार बारकाईने लक्ष द्यावे लागते
Pregnancy Diet
Pregnancy Dietesakal

महिला गर्भवती असताना तिच्या आरोग्याकडे तिला फार बारकाईने लक्ष द्यावे लागते. कारण एका वेळी तिला तिची आणि बाळाची काळजी घेत आरोग्याचा समतोल राखायचा असतो. टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या गरोदर असून मातृत्वाच्या सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे.

सोशल मीडियावरून गुड न्यूज शेअर केल्याने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा चालली आहे. अभिनेत्रीने तिच्या गुड न्यूजसह तिच्यासारख्या गर्भवती महिलांसाठी तीन महिन्यांचा एक खास डाएट प्लान शेअर केलाय.

दीपिकाने सांगितले की, तिच्या गरोदरपणाच्या बातमीने तिचे कुटुंबीय आणि चाहतेही खूप खूश आहेत. दीपिका ककरने पहिल्या तीन महिन्यांचा तिचा डाएट प्लॅन चाहत्यांसोबत शेअर केला आहे. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात काय खावे, कोणता डाएट प्लॅन फॉलो करावा हे तिने त्यात सांगितले आहे.

Pregnancy Diet
Pregnancy Diet

प्रेग्नेंसीच्या तीन महिन्यांपूर्वी असा असावा डाएट प्लान

घरचे अन्न खा

गरोदरपणाचे पहिले तीन महिने खूप कठीण असतात. या काळात जेवणाची विशेष काळजी घ्यावी लागते. दीपिकाने तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिने तिच्या गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत फक्त घरी बनवलेले अन्न खाल्ले आहे. यादरम्यान त्याने बाहेरील अन्नाला हातही लावला नाही.

जंक फूडपासून दूर राहा

पहिल्या तीन महिन्यांत अभिनेत्रीने जंक फूडकडे ढुंकूनही पाहिले नाही. तिने सांगितले की निरोगी बाळासाठी निरोगी अन्न खूप महत्वाचे आहे, त्यामुळे जंक फूडपासून दूर राहणे योग्य आहे. जंक फूड टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. कारण अशा प्रकारच्या अन्नामुळे गॅस्ट्रिकचा त्रास होतो, जो बाळासाठी चांगला मानला जात नाही.

Pregnancy Diet
Healthy Pregnancy : तिशीत प्रेग्नेंसी प्लान करताय? प्रजननक्षमता वाढवण्यासाठी करा 'हा' उपाय

या गोष्टींचा आहारात समावेश करा

अभिनेत्री दीपिका कक्कर हिने सांगितले की, तिने फक्त सकाळच्या नाश्त्यात फळांचा समावेश केला होता. याशिवाय ती नाश्त्यात दुसरे काहीही खात नव्हती. याचा एक व्हिडिओही तिने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्या प्लेटमध्ये सफरचंद, नाशपाती आणि केळी दिसत आहेत. तिने गर्भवती महिलांना त्यांच्या मूडनुसार फळे आणि भाज्या आहारात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सुका मेवा खाणे देखील फायदेशीर आहे. मुलाच्या वाढीस त्याचा फायदा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com