
Heart Attack : सुपर फिट सुष्मिताला हार्ट अटॅक कसा काय आला? तुमच्या 'या' सवयी ठरतात जीवघेण्या..
Heart Attack : आजही सुपर फिट सुष्मिता सेनच्या वयाचा अंदाज कोणी लावू शकत नाही. या 47 वर्षीय अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्या इन्स्ट्राग्राम पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. बॉलीवूड क्वीन सुष्मिता सेन रोज योगा आणि व्यायामासोबत तिच्या आहाराची पूर्ण काळजी घेते आणि हेच तिच्या फिटनेसचे रहस्य आहे. मात्र तरी या अभिनेत्रीच्या काही सवयी तिच्यासाठी जीवघेण्या ठरल्या. तुम्हालाही या सवयी असतील तर वेळीच व्हा सावध.
सुष्मिता सेन दीर्घकाळ धूम्रपान करते. एका आजारामुळे, सुष्मिता सेनची अॅड्रेनल ग्लँड नीट काम करत नाही, त्यासाठी स्टेरॉईड्स घेणे आवश्यक आहे. आज बॉलिवूड सेलिब्रिटींची स्ट्रेस लेव्हल कोणापासून लपलेली नाही. मात्र तो स्ट्रेस दूर करण्यासाठी धुम्रपान करणे हा मार्ग नसावा.

या कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो
डॉक्टरांच्या मते, तंदुरुस्त दिसणे आणि निरोगी हृदय असणे यात खूप फरक आहे. तुम्ही योगा आणि व्यायाम करता, तरीसुद्धा कोणत्याही कारणामुळे तुम्हाला समस्या येत असतील तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
जर तुम्हाला जास्त धूम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर तुम्हाला हृदयविकाराच्या समस्येला सामोरे जावे लागते. काहीवेळा हृदयाच्या समस्या वाढवण्यात तणावाची मोठी भूमिका असते. याशिवाय कुटुंबातील कोणाला विशेषत: आई-वडिलांना हृदयविकार असेल तर तो मुलामध्येही होऊ शकतो. यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणामुळेही हृदयाशी संबंधित आजार होतात.
डॉक्टर या टेस्ट करण्याचा सल्ला देतात
एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, दिल्लीचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. अतुल माथूर यांच्या मते, हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या चाचण्या आहेत आणि या चाचण्या वयाच्या 35 वर्षांनंतर केल्या पाहिजेत. तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आधी हे आजार ओळखायला शिका.
ही चाचणी करून घ्या आणि तुमच्या हृदयाची स्थिती तपासा
हृदयाची स्थिती इलेक्ट्रो-कार्डिओ-ग्राम चाचणीद्वारे ओळखली जाते. त्याला थोडक्यात ईसीजी असेही म्हणतात. ईसीजीमध्ये विद्युत लहरींच्या रूपात हृदयाचे ठोके दिसू शकतात आणि या लहरींद्वारे हृदयविकाराचा शोध घेतला जातो. याशिवाय, तुम्ही इको-कार्डिओ-ग्राम चाचणी देखील करू शकता. आपण त्याला ECHO Test या नावाने देखील ओळखतो.
यामध्ये तुमच्या हृदयाचे वॉल्व्ह्ज आणि चेंबर्सचे चित्र उच्च-फ्रिक्वेंसी ध्वनी लहरींद्वारे तयार केले जाते आणि तुमच्या हृदयाची कार्य करण्याची क्षमता ओळखली जाते. हृदयासाठी ट्रेडमिल चाचणी देखील केली जाते. यासाठी रुग्णाला ट्रेडमिलवर धावावे लागते किंवा चालावे लागते आणि शारीरिक श्रम करताना तुमच्या हृदयावर ताणाचा परिणाम नोंदवला जातो.
या तीन प्राथमिक चाचण्या आहेत. (Health News) या चाचण्यांचा डेटा तुमच्या हृदयाविषयी महत्त्वाची माहिती देतो. या चाचण्यांमध्ये काही अडचण आढळल्यास अॅडव्हान्स टेस्ट आवश्यक आहे. वयाच्या 35 ते 40 वर्षानंतर, तुम्ही या सर्व चाचण्या दरवर्षी एकदा करून घ्याव्यात. जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल आणि तुमचा रक्तदाब सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी असेल किंवा तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीही जास्त असेल, तर तुम्ही वयाच्या 30 वर्षापूर्वीच हृदयाची तपासणी करून घेऊ शकता. जर तुमचे पालक किंवा तुमच्या कुटुंबातील इतर कोणत्याही नातेवाईकाला हृदयविकार असेल. किंवा त्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तुम्हाला आणखी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.