हार्ट अटॅक आला तेव्हा कुठे होती सुश्मिता? 27 फेब्रुवारीला कसं आणि काय घडलं होतं अभिनेत्री सोबत Sushmita Sen Heart Attack Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen

Sushmita Sen: हार्ट अटॅक आला तेव्हा कुठे होती सुश्मिता? 27 फेब्रुवारीला कसं आणि काय घडलं होतं अभिनेत्री सोबत

Sushmta Sen: सुश्मिता सेननं २ मार्च ला चाहत्यांसोबत आपल्याला हार्ट अटॅक येऊन गेल्याची एक बातमी शेअर करत सगळ्यांनाच हैराण करून सोडलं. अर्थात सोबत तिनं गूड न्यूजही दिली की ती यातून रीकव्हर होतेय.

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिनं जास्त सविस्तर काही लिहिलं नव्हतं. फक्त हेल्थ अपडेट देत लिहिलं होतं की तिची एन्जियोप्लास्टी झाली आहे.

आता सुश्मिताच्या जवळच्या एका सूत्रानं दिलेल्या माहितीच्या आधारावर कळत आहे की सुश्मिताला २७ फेब्रुवारीला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी ती शूटिंग करत होती. तसं,सु्श्मितानं देखील इतर सविस्तर माहिती ती नंतर शेअर करेल असं म्हटलं होतं.(Sushmita Sen heart attack updates details)

सुश्मिताचे चाहते तिच्या हार्ट अटॅकच्या बातमीनं चिंतेत पडले आहेत. सुश्मितानं तिला हार्ट अटॅक कधी आला आणि कसं सगळं घडलं याविषयी काहीच माहिती दिली नव्हती. पण तिनं आपण आता ठीक आहोत हे नक्कीच सांगितलं होतं.

आता समोर आलेल्या माहितीनुसार,सुश्मिताला २७ फेब्रुवारी रोजी हार्ट अटॅक आला होता. तिला सेटवरनं नानावटी हॉस्पिटलला नेण्यात आलं. आणि उपचारानंतर तिला १ मार्चला डिस्चार्ज देण्यात आला.

सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार,सुश्मिता आपल्या एका असाइनमेंटचे शूटिंग करत होती.

हेही वाचा: बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

शूटिंग करतानाच तिला छातीत दुखू लागलं. सेटवर उपस्थित मेडिकल टीमनं तिचं चेकअप केलं आणि तिला त्वरित हॉस्पिटलला हलवलं.

हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आणि डॉक्टरांच्या टीमनं तिची तपासणी केल्यानंतर एन्जियोप्लास्टी करण्याचा सल्ला तिला दिला गेला.

सुश्मिताला १ मार्चला हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले.