Alkaline Water Benefits : या चमत्कारी पाण्याचे आहेत अनेक फायदे, श्री श्री रविशंकरांनी सांगितलं महत्व

Health Tips : हल्लीची खद्य पद्धती ही फार अॅसिडीक झाली आहे. त्यामुळे अनेक विकार जडतात.
Alkaline Water Benefits
Alkaline Water Benefitsesakal
Updated on

Gurudev Shri Shri Ravi Shankar Health Tips : हल्लीची जीवन पद्धती आणि खाण्या पिण्याच्या बिघडलेल्या सवयी यामुळे माणसाला अनेक आजार जडतात. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत आणि सवयींमध्ये थोडासाही योग्य बदल केला तर माणसाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात.

त्यासाठी अध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांनी काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यांच्या या टिप्स सर्वांना उपयुक्त ठरू शकतात.

Alkaline Water Benefits
Alkaline Water Benefitsesakal

गुरुदेव आपल्या प्रवचनांमधून अनेक सोप्या पण महत्वपूर्ण गोष्टींवर लोकांना मार्गदर्शन करत असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील या सोप्या गोष्टी आपल्या अनेक त्रासांवर गुणकारी ठरू शकतात.

अशाच एका प्रवचनाचा व्हिडीओ त्यांच्या यू-ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी डोकंदुखी, गुडघे, कंबर, पाठदुखी अशा त्रासांवर एक सोपा आणि गुणकारी उपाय सांगितला आहे.

Alkaline Water Benefits
Monsoon Health Care : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीये? मग आहारात घ्या 'हे' महत्त्वाचे पदार्थ!
Alkaline Water Benefits
Alkaline Water Benefitsesakal

अॅसिडीक जेवण

श्री श्री रवि शंकर सांगतात की, तुम्ही जेवढंही जेवण करतात ते सर्व अॅसिडीक असतं. मसालेदार भाज्या, धान्यांचा मोठा वापर यामुळे शरीरात अॅसिडीक पदार्थ जास्त जातात. त्यांना बॅलंस करणं गरजेचं असते. यासाठी अल्कलाइन पदार्थांचे सेवन आवश्यक असते.

त्यामुळे अल्कलाइन काय आणि अॅसिडीक काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. जेवढे धान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी आदी हे सर्व अॅसिडीक होते तर सर्व भाज्या या अल्कलाइन असतात. त्यामुळे चपाती, भाकरी पेक्षा भाज्यांचे आहारात सेवन वाढणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Alkaline Water Benefits
Monsoon Health Tips : गॅरेंटी देऊन सांगतो पावसाळ्यात श्वसनाचे हे आजार तुम्हाला होणारच, आधीच घ्या ही काळजी!
Alkaline Water Benefits
Alkaline Water Benefitsesakal

अल्कलाइन पाणी

अल्कलाइन जेवणाबरोबरच अल्कलाइन पाणी पिणेही आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अल्कलाइन पाणी कसे बनवावे हे देखील त्यांनी सांगितले आहे.

कसे बनवावे अल्कलाइन पाणी

  • एक लीटर पाणी घ्यावे.

  • त्यात काकडीच्या ४-५ लहान फोडी घालाव्या.

  • त्यात लिंबाच्या २ बारीक फोडी घालाव्या.

  • हे पाणी रात्रभर झाकून ठेवावे.

  • हे अल्कलाइन पाणी १ ते दीड दिवस पिऊ शकतात.

कधी प्यावे हे पाणी?

  • सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.

  • शिवाय जेवणा आधी किंवा नंतर लगेच पिऊ नये.

  • उलट जेवण झाल्यावर दोन तासांनी हे पाणी पिणे फायदेशीर असते.

फायदे

  • अल्कलाइन पाणी प्यायल्याने रक्त अल्कलाइन होतं.

  • त्यामुळे डोकेदुखी, गुडघेदुखी हे सगळं आपोआप दूर होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com