Antibiotic Side Effects: चाळीशीनंतर अँटिबायोटिक्स घेणे धोक्याचेच; संशोधकांचा धक्कादायक खुलासा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Antibiotic Side Effects

Antibiotic Side Effects: चाळीशीनंतर अँटिबायोटिक्स घेणे धोक्याचेच; संशोधकांचा धक्कादायक खुलासा!

वेगवेगळ्या व्हायरल आजारांवर अँटिबायोटिक्स हा रामबाण उपाय मानला जातो. त्यामूळे अँटिबायोटिक्स गोळ्यांच्या सेवनाचा अतिवापर केला जातो. पण, चाळीशीनंतर या औषधांचा अतिवापर करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

वयाची ४० वर्ष ओलांडल्यानंतर अँटिबायोटिक्स जरा जपून खाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कारण त्यांच्यामुळे पोटासंबंधीच्या रोगाचा धोका ४८ टक्क्यांनी वाढतो.

गुट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, पोट किंवा आतड्यांसंबंधी आजारांवर सतत अँटीबायोटिक्स घेतल्याने एक ते दोन वर्षांनी अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीजचा धोका वाढतो.

हेही वाचा: Stomach Infection : .....म्हणून तुमचं पोट बिघडतं

न्यूयॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांनी सुमारे 61 लाख लोकांचे विश्लेषण केले. यामध्ये असे आढळून आले, की जे लोक कोणत्याही कारणास्तव सतत अँटिबायोटिक्सचा वापर करतात.

त्यांना आयबीडी म्हणजेच अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीजचा धोका संभावतो. याउलट जे लोक अँटिबायोटिक्स घेत नाहीत त्यांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे नसतात.

हेही वाचा: Women Life : डोक्यावरचा एक-एक केस उपटून टाकतात महिला नागा साधू

संशोधकांनी या रोगाच्या अभ्यासासाठी 2000 पासून 2018 दरम्यान 61 लाख लोकांचा अभ्यास केला. यामध्ये 10 वर्षाच्या मुलांपासून 60 वर्षे वयोगटातील लोकांचा सहभाग होता.

यातील ५५ लाख लोकांना डॉक्टरांनी अँटिबायोटिक लिहून दिले होते. अँटिबायोटिक्स घेतलेल्या लोकांपैकी 36 हजार 17 लोकांना अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि 16 हजार 881 लोकांमध्ये क्रोहन रोगाची लक्षणे दिसली.

हेही वाचा: उष्णता वाढल्यावर ताकात 'या' पाच गोष्टी टाका आणि पोटाचे विकार कायमचे दूर पळवा

10-40 वयोगटातील ज्या लोकांनी अँटिबायोटिक्स घेतले होते. त्यांना अँटिबायोटिक्स न दिल्या गेलेल्या लोकांपेक्षा अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज होण्याची शक्यता 40 टक्के जास्त होती.

तर, 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये हा धोका 48 टक्क्यांनी वाढला होता. अभ्यासात असेही दिसून आले की 1-2 वर्षे अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीजचा धोका सर्वाधिक असतो.

हेही वाचा: Weightloss Resolution : रोजच्या जीवनात 'हे' छोटेसे बदल करा अन् झटपट पोट कमी करा

यासाठी 10-40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये आयबीडीचा धोका 40 टक्के जास्त असल्याचे आढळून आले. त्याच वेळी, 40 ते 60 वर्षे वयोगटातील 48 टक्के लोकांमध्ये आयबीडीचा धोका आढळून आला.

हेही वाचा: Winter Health Care : थंडीनं तापमानाचा पारा घसरला; हार्ट अटॅकचाही धोका वाढला, अशी घ्या काळजी

या अभ्यासात अँटिबायोटिक्सचे प्रकारांचाही अभ्यास केला गेला. आयबीडीचा सर्वाधिक धोका नायट्रोइमिडाझोल आणि फ्लुरोक्विनोलोनशी संबंधित होता. ते सहसा आतड्यांसंबंधी संक्रमणांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात.

हेही वाचा: Health Tips : तुम्ही देखील दुसऱ्यांचा कंगवा वापरताय? 

नायट्रोफुरंटोइन हे अँटिबायोटिक घेतल्याने आयबीडीचा धोका नसतो हेही या संशोधनात स्पष्ट झाले. स्पेक्ट्रम पेनिसिलिन या औषधांनीही आयबीडीचा धोका वाढतो.

तसेच, अँटिबायोटिक्समुळे आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये मोठे बदल होतात. मात्र, यामागची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

हेही वाचा: Bone Health : सावधान ! हे पदार्थ तुमची हाडे खिळखिळी करतात

काय आहे IBD

क्रोहन हा एक दाहक आंत्र विकार (IBD) आहे. या आजारामूळे पचनसंस्थेला सूज येते. परिणामी पोटदुखी, तीव्र अतिसार, थकवा, वजन कमी होणे आणि उपासमार होते.

क्रोहन रोग-संबंधित जळजळ विविध व्यक्तींमध्ये पचनसंस्थेमध्ये आढळणाऱ्या विविध भागांवर परिणाम करू शकते.

टॅग्स :antibioticsstomachhealth