Women Life : डोक्यावरचा एक-एक केस उपटून टाकतात महिला नागा साधू

महिला नागा साधूंना फक्त भगवा रंग परिधान करण्याची परवानगी आहे. महिला नागा साधू शिवलेले कपडे घालत नाहीत.
female naga sadhu
female naga sadhusakal

मुंबई : हिंदू धर्मात अनेक प्रकारच्या साधूंचे वर्णन आढळते. यापैकी एक आहे नागा साधू. पुरूष नागा साधूंबद्दल अनेकांना माहीत असत. पण महिला नागा साधूंबद्दल फार कमी माहिती आपल्याला असते. (Female Naga Sadhu)

महिला नागा साधूंचे नियम पुरुष नागा साधूंइतकेच कठोर असतात आणि विशेष बाब म्हणजे महिला नागा साधूंशी संबंधित अशा अनेक रहस्यमय गोष्टी सर्वांना माहीत नसतात. हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

female naga sadhu
Long Distance Relationship : तुम्ही देशात, जोडीदार परदेशात; शरीरसुख कसे मिळवाल ?

महिला नागा साधूंचे जीवन देखील पूर्णपणे शंकराला समर्पित आहे. स्त्री नागा साधूला आईसारखा मान असतो. दशनम सन्यासिनी आखाड्यात बहुतेक महिला नागा साधू बनतात. कारण इतर कोणत्याही आखाड्यात महिलेचे नागा बनणे अद्याप सुरू झालेले नाही.

महिला नागा साधूंना कपड्यांसह संन्यास घेण्याची परवानगी आहे. मात्र, ती फक्त एकाच रंगाचे आणि एकच कापड घालू शकते. महिला नागा साधूंना फक्त भगवा रंग परिधान करण्याची परवानगी आहे. महिला नागा साधू शिवलेले कपडे घालत नाहीत.

female naga sadhu
female naga sadhugoogle
female naga sadhu
Blood Leakage : मासिक पाळीदरम्यान पॅडमधून रक्त गळू लागल्यास काय कराल ?

नागा साधू होण्यापूर्वी स्त्रीला ब्रह्मचर्य पाळावे लागते. ६ ते १२ वर्षे ब्रह्मचर्य पाळल्यानंतरच महिलांना नागा साधू बनवले जाते. महिला नागा साधूंना कठोर साधना करावी लागते. त्यांना सकाळी लवकर उठून नदीत स्नान करावे लागते. आंघोळ हिवाळ्यातही थंड पाण्यानेच केली जाते.

स्नानानंतर संपूर्ण दिवस शंकराच्या पूजेत घालवावा लागतो. संध्याकाळच्या वेळी भगवान दत्तात्रेयांची पूजा करण्याचा विधी त्यांना पाळावा लागतो. महिला नागा साधू देखील तांत्रिक विधी करतात. नागा साधू बनण्यापूर्वी महिलांना पिंडदान करून भूतकाळाचा त्याग करावा लागतो.

महिला नागा भिक्षू बनण्यासाठी, महिलांना त्यांचे केस मुंडवावे लागतात. मात्र त्या केस कापत नाहीत तर एक-एक केस उपटून टाकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com