Anxiety : आर्टिफिशियल शुगरमुळे Anxietyचा वाढता धोका; अभ्यासातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anxiety

Anxiety : आर्टिफिशियल शुगरमुळे Anxietyचा वाढता धोका; अभ्यासातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती

Anxiety : आजकाल सगळेच लोकं नैसर्गिक साखरेपेक्षा आर्टिफिशियल शुगर वापरण्याला प्राधान्य देता आहेत, मुळात यात एनर्जी आणि कॅलरी कंटेंट कमी असल्यामुळे हे लोकांना हेल्दी वाटत पण असं नाहीये, अनेक स्नॅक्स आणि कोल्डड्रिंक्समध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात हे आर्टिफिशियल शुगर वापरले जातात.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणाऱ्या बाजरी मेथी पुऱ्या कशा तयार करायच्या?

एका रिसर्चनुसार, बाजारतल्या जवळजवळ 5000 हूनही अधिक उत्पादन जस की कोल्डड्रिंक्स, स्नॅक्स अशा गोष्टींमध्ये आर्टिफिशयल शुगर आढळते. या आर्टिफिशयल शुगरच्या सेवनाने लोकांमध्ये स्ट्रेसच प्रमाण वाढत आहे. कारण आर्टिफिशयल शुगरमध्ये एस्पार्टिक ऍसिड, फेनिलॅलानिन आणि मिथेनॉल असते आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Trampoline Park : लहानपण मनमुराद जगता येईल अशा पुण्यातील ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये एक टूर तो बनती है!

नक्की काय आहे एस्पार्टम

1981 मध्ये, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने एस्पार्टमला स्वीटनर असल्याच घोषित केलं आणि आता, दरवर्षी जवळजवळ 5,000 मेट्रिक टन कृत्रिम स्वीटनरचे उत्पादन केले जाते. एस्पार्टमचे सेवन केल्यावर एस्पार्टिक ऍसिड, फेनिलॅलानिन आणि मिथेनॉल बनते. या तिघांचा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर जोरदार परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: Bissi Bele Bhath : रोजचं डाळ भात, खिचडी खाऊन बोर झालात? ट्राय कर साऊथ इंडियन स्टाईल बीसी बेले भात

डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात FDA ने मानवी सेवनाच्या अंदाजाने 15 टक्के एस्पार्टम असलेले पिण्याचे पाणी उंदरांना दिले गेले. चार वर्षांच्या अभ्यासात 12 आठवडे डोस चालू होता, एस्पार्टम असलेल्या उंदरांमुळे त्यांच्या पुढच्या पिढीत चलबिचलता आणि स्ट्रेसचे प्रमाण वाढतांना दिसले. याची तीव्रता इतकी जास्त होती बहुदा याची कल्पना कोणत्याही संशोधकाने केली नसावी. डायजेपाम हे आपल्या शरीरातल्या स्ट्रेसला बस्टर करण्याच काम करत. हे औषध उंदरांना दिलं असता त्यांच्यातली अस्थिरता कमी झाली.

हेही वाचा: Wedding Look Lipstick Shade : नाईट लुकसाठी असायलाच हव्या या लिपस्टिक शेडस! हिना खान कडून घ्या इंस्पिरेशन

कृत्रिम स्वीटनर्स आणि इतर रोगांमधील संभाव्य दुवे

जगभरातील अन्नपदार्थांच्या हजारो ब्रँडमध्ये कृत्रिम स्वीटनर्स आढळतात, परंतु ते एक वादग्रस्त विषय राहिले आहेत. BMJ च्या मते, सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, कृत्रिम स्वीटनरचा अति वापर, विशेषत: एस्पार्टम, सुक्रॅलोज आणि एस्सल्फेम पोटॅशियम आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढला आहे.

हेही वाचा: Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

यापूर्वी, कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सांगितले की जे लोक नियमितपणे आर्टिफिशियल शुगर असलेल्या पदार्थांचे सेवन करतात, त्यांना लठ्ठपणा आणि वजन वाढणे यासारख्या आरोग्य समस्यांचा धोका जास्त असतो. हा रिसर्च रीपोर्ट प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये पब्लिश झाला आहे आणि फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी तो सादर केला आहे.