Bissi Bele Bhath : रोजचं डाळ भात, खिचडी खाऊन बोर झालात? ट्राय कर साऊथ इंडियन स्टाईल बीसी बेले भात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bissi Bele Bhath

Bissi Bele Bhath : रोजचं डाळ भात, खिचडी खाऊन बोर झालात? ट्राय कर साऊथ इंडियन स्टाईल बीसी बेले भात

Bissi Bele Bhath : साऊथ इंडियन पदार्थांची वेगळीच जादू आहे, त्यांची चव खूप सुंदर असते आणि प्रत्येकाला साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडतात. साऊथ इंडियन बीसी बेले भात ही तशीच एक रेसिपी आहे. ही बनवण्याची पद्धत पारंपरिक असल्यामुळे याबद्दल लोकांमध्ये खूप आकर्षण आहे.

हेही वाचा: Wedding Look Lipstick Shade : नाईट लुकसाठी असायलाच हव्या या लिपस्टिक शेडस! हिना खान कडून घ्या इंस्पिरेशन

‘बीसी बेले भात’ ही दक्षिण भारतातील खूप लोकप्रिय व स्वादिष्ट रेसिपी आहे. साऊथ इंडियन लोकं साधारणपणे रात्रीच्या जेवणात या भाताला प्राधान्य देतात, मुळात रात्री तसंही काहीतरी लाइट जेवण करावं असं म्हणतात त्यामुळे हा भात रात्री बनवायला खूप फायदेशीर आहे. यात खूप प्रकारच्या भाज्या आणि मसाले असतात, जो चवीला खूप छान लागतो. बघूया याची रेसिपी..

हेही वाचा: Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

साहित्य:

1/2 कप गाजर

1/2 कप मटार

1/2 कप बटाटा

1/2 कप फरसबी

1 कप टोमॅटो

1 कप तांदूळ

1/2 कप तूर डाळ

1 कप शेंगदाणा तेल

1/2 कप तूप

आवश्यकतेनुसार मोहरीच्या बिया

आवश्यकतेनुसार दालचिनी

4 - लवंग

आवश्यकतेनुसार जायफळ

6/7 - काजू

2 - लाल मिरची

आवश्यकतेनुसार कढीपत्ता

आवश्यकतेनुसार हिंग

आवश्यकतेनुसार हळद

1 कप किसलेले नारळ

आवश्यकतेनुसार गूळ

आवश्यकतेनुसार मीठ

हेही वाचा: Christmas Holiday : नाताळमुळे शाळांना सुट्या; चिमुकल्यांत उत्साह

कृती:

Step 1: मसाला भातासाठी फोडणी द्या

कुकरच्या भांड्यात तेल गरम करायला ठेवा. यानंतर त्यात तूप घाला. आता यामध्ये एक चमचा मोहरी, लवंग, जायफळ, काजू, बेडगी मिरच्या आणि कढीपत्ता फ्राय करून घ्या. दोन ते तीन मिनिटांसाठी सर्व सामग्री नीट फ्राय करा.

हेही वाचा: Health News : भरड धान्य खा, अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!

Step 2: भाज्या मिक्स करा

आता पॅनमध्ये चिमूटभर हळद आणि हिंग मिक्स करा. यानंतर चिरलेल्या भाज्या (गाजर, मटार, बटाटे आणि फरसबी) फ्राय करून घ्याव्यात. थोड्या वेळाने चिरलेला टोमॅटो देखील पॅनमध्ये घालावा आणि व्यवस्थित मिक्स करा. दोन ते तीन मिनिटांसाठी सर्व सामग्री नीट शिजू द्या. भाज्या मिक्स केल्यानंतर एक कप बारीक किसलेले खोबर घाला. यानंतर मसाला घालून सामग्री नीट ढवळा.

हेही वाचा: Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल तयार करा, चॉकलेट अँड आल्मंड रम बॉल

Step 3: डाळ आणि तांदूळ शिजवून घ्या

यानंतर भिजवलेली डाळ आणि तांदूळ भांड्यामध्ये घाला. पाणी ओतून सर्व सामग्री नीट शिजवून घ्या. आता आवश्यकतेनुसार गूळ आणि मीठ घाला. सर्व सामग्री पुन्हा एकदा ढवळा आणि कुकरचे झाकण लावा.

Step 4: गरमागरम राइस प्लेट आहे तयार

दोन ते तीन शिट्या येईपर्यंत भात शिजू द्या. गरमागरम बीसी बेले भात तयार आहे.