Covid 19 सेल्फ टेस्टिंग किट किती विश्वासार्ह? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

RAT एक चांगले होम टेस्टिंग किट आहे पण त्याच्या अचूकतेबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.
How Useful Covid-19 Self Test Kit
How Useful Covid-19 Self Test Kitsakal

Self Testing Kits For Covid-19: तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोनाची तिसरी लाटेचा प्रसार दुसऱ्या लाटेच्या तुलनेत वेगात झाला. कोरोना सुरुक्षा प्रोटोकॉलचे पालन न करण्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावेळी डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिअंट दोन्हीही चिंतेचे कारण बनले आहे.तनसेच कोरोना बाधितांच्या संख्येत अचानत वाढ झाल्यामुळे देशभरात सेल्फ टेसिंग किटची (slef Testing Kit)मागणी वाढली आहे. बाजारात या किटची किंमत २५० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत आहे. हे किट आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे केल्या जाणाऱ्याआरटी-पीसीआर (रिवर्स ट्रांसक्रिप्शन-पोलीमरेज़ चेन रिएक्शन) चाचणीच्या कमी- जास्त होणाऱ्या दरांसाठी स्वस्ता पर्याय आहे. (Are Self-Testing Kits For Covid-19 Reliable Know Which is The Best Option)

How Useful Covid-19 Self Test Kit
Relationship Tips : गरजेपेक्षा जास्त भावनिक आहे जोडीदार, नातं कसे टिकवावे?

इकोनॉमिकटाइम्सच्या वृत्तनुसार,जरी किफायतशीर असले तरी, रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) किट घरातील लोकांसाठी स्वातंत्र्य आणि लवचिकता देते.लोक घरबसल्या सहज आपली कोरोना टेस्ट करू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का त्याचा रिझल्ट योग्य आहे किंवा होम टेस्टिंग किट किती विश्वासार्ह आहेत? (How Useful Covid-19 Self Test Kit)

बहुतेक रॅपीड अन्टीजन परीक्षण टेस्ट नाकातील स्वॅब वापरू केले जातात आणि परिणाम केवळ १५ मिनिटांमध्ये समोर येतोय घरेलू होम टेस्टिंग आरएटी किट वापरण अत्यंत सोपे आहे. फोर्टिस हॉस्पिटल, शालीमार बागेत एचओडी आणि संचालक-पल्मोनोलॉजी डॉ विकास मौर्य काव्य म्हणाले, RAT किट जनुक चाचण्यांपेक्षा(Gene Testing) कमी विश्वासार्ह आहेत आणि खोटे-नकारात्मक किंवा खोटे-सकारात्मक रिझल्ट देऊ शकतात. खोटे-नकारात्मक रिझल्टबाबत सांगताना ते म्हणाले, हे अतिशय असामान्य आहे, परंतु विशिष्ट प्रथिनांचा शोध घेतल्यास 100 पैकी एक किंवा अधिक चाचण्यापैकी एकामध्ये असा रिझल्ट दिसतो.

How Useful Covid-19 Self Test Kit
सकाळ, संध्याकाळच्या व्यायामाचा शरीरावर वेगवेगळा परिणाम! अभ्यासात झाले स्पष्ट

SRL डायग्नोस्टिक्सचे सीईओ आनंद के. म्हणतात की.'' खोटे-नकारात्मक रिझल्ट येतो तेव्हा RAT रुग्णांना सुरक्षिततेची खोटी भावना देऊ शकते. जर लोक सावधगिरीच्या चाचणीसाठी त्यांचा वापर करत असतील तरच होम किटची शिफारस केली जाते.''

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. लक्ष्मण जेसानी, म्हणतात की, ''25 ते 30 टक्के प्रकरणांमध्ये, सेल्फ टेस्ट खोटे-नकारात्मक रिझल्ट दर्शवते. नकारात्मक रिझल्ट म्हणजे चाचणीमध्ये विषाणू आढळला नाही किंवा तुम्हाला तो संसर्ग झाला नसावा, परंतु यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जसलोक हॉस्पिटलच्या जेरियाट्रिक्स विभागाचे सल्लागा रडॉ. नागनाथ नरसिंहन प्रेम, म्हणतात की,' RATहा एक चांगला होम किट आहे पण त्याची अचूकता अजूनही वादाचा विषय आहे. कोविड स्वयं-चाचणीच्या अचूकतेमध्ये मागे आहे कारण त्यात खोटे-निगेटिव्ह रिपोर्ट असण्याची शक्यता RT-PCR पेक्षा जास्त आहे.''

How Useful Covid-19 Self Test Kit
Relationship Tips: पार्टनरसोबत दिवसाची सुरुवात करा 'या' 4 टिप्सने

कोविड चाचणीसाठी आरटी-पीसीआरला ‘गोल्ड स्टँडर्ड’ का म्हटले जाते?

आरटी-पीसीआर चाचणी नमुन्यातील रिबोन्यूक्लिक अॅसिड (आरएनए) जीनोमचा अभ्यास करते आणि अधिक अचूक परिणाम देण्यासाठी विषाणूचे अनुवांशिक घटक शोधते. बेंगळुरूमधील मिलर्स रोड, येथील मणिपाल हॉस्पिटल्स सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट आणि चेस्ट फिजिशियन डॉ. वसुनेत्रा कासारगोड सांगतात की,''कोविड चाचणीमध्ये आरटी-पीसीआर (आण्विक चाचणी) हे सुवर्ण मानक मानले जाते कारण ते लक्षणे नसलेल्या व्यक्तींमध्ये वापरले जाते (ज्यामध्ये कोविडची लक्षणे नसतात) संसर्गाचे निदान देखील करू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com