शरीराला द्या न्यूट्रिलाईट प्लांट प्रोटीन पावडरची उर्जा

नित्यनेमानं व्यायाम करणे, दररोज पुरेसे पाणी पिणे, मेडिटेशन किंवा ध्यान-धारणा, आणि आहारात प्रथिनांचा म्हणजेच प्रोटिन्सचा अधिकाधिक समावेश करावा याबाबत आपण ऐकत आणि बोलत असतो.
nutrilife of plant Protein Powder
nutrilife of plant Protein Powderesakal

नित्यनेमानं व्यायाम करणे, दररोज पुरेसे पाणी पिणे, मेडिटेशन किंवा ध्यान-धारणा, आणि आहारात प्रथिनांचा म्हणजेच प्रोटिन्सचा अधिकाधिक समावेश करावा याबाबत आपण ऐकत आणि बोलत असतो. पण आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करणं आपल्याला अनेकदा शक्य होत नाही. मात्र, आपण यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.

प्रथिनांचं महत्त्व आणि त्यांचं शरीरासाठी काम याबाबद्दल आपल्याला माहिती आहे का? मानवी शरीराच्या प्रत्येक पेशीत प्रथिनं असतात याची माहिती आपल्याला आहे का? आपले केस, त्वचा आणि शरीराच्या सर्व अवयवांमध्ये आणि ऊतींमध्ये प्रथिनं असतात. जिम आणि फिटनेस सेंटरमध्ये आपण मसल मास तयार करणे आणि टिकवून ठेवणे हे आपण ऐकत असतो. पण त्या पलिकडे जाऊन प्रथिनांचं महत्त्व आहे.

जाणून घेऊयात प्रथिनांविषयीची काही तथ्ये

प्रथिनं हे अ‍ॅमिनो अ‍ॅसि़डसनी तयार झालेले मोठे रेणू असतात. त्यांना मानवी जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलं जातं. पेशींची दुरुस्ती आणि नव्या पेशी तयार करण्याचं काम प्रथिनं करतात. सर्व वयोगटातल्या व्यक्तींच्या सर्वांगिण वाढीसाठी आणि विकासासाठी प्रथिनं महत्त्वाची असतात. जी अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स अस्तित्त्वात आहेत, त्यापैकी नऊ अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस ही अत्यावश्यक असतात. ही अ‍ॅसिडस शरीर तयार करत नाही.

अन्य स्त्रोत आणि पूरक आहारातून ते मिळवावं लागतं. त्यामुळेच आपल्याला केवळ चांगली प्रथिनंच नव्हे तर न्यूट्रिलाईट ऑल प्लांट प्रोटीन पावडर सारख्या प्रथिनांची, ज्यात पीडीसीएएएस=1.0 असलेल्या प्रथिनांचे उच्च गुणवत्तेचे स्त्रोत घेणं आवश्यक आहे. प्रोटीन डायजेस्टेबिलिटी करेक्टेड अमिनो ॲसिड्स स्कोअर (पीडीसीएएएस) हा डब्ल्यू.एच.ओ ने स्थापित केलेला एक जागतिक मानक आहे त्याचा स्कोअर 1.0 आहे आणि गुणवत्तेसाठी सर्वोच्च संभाव्य स्कोअर दर्शवितो.

यालाच पचनक्षमतेच्या दृष्टीने योग्य स्कोअर मानलं जातं. यातून आवश्यक असलेली ९ अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्सही मिळतात. प्रोढ व्यक्तींना दररोज शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलो मागे कमीतकमी 0.83 ग्रॅम प्रथिने मिळाली पाहिजेत अशी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), 2020 ची शिफारस आहे. परंतु बऱ्याचवेदा आपल्या दैनंदिन आहारातून या गरजा पूर्ण होत नाहीत.

प्रथिनांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता नसल्यामुळे आणि आपला दैनंदिन आहार शिफारस केलेल्या नियमांची पूर्तता करत नसल्यामुळे हे घडते. प्रथिनांचा बाह्य स्त्रोत आपल्या आरोग्याला हातभार लावतो हे उपलब्ध पुरावे स्पष्ट झाले आहे. अस्तित्वात असलेल्या २० अ‍ॅमिनो अ‍ॅसिडसपैकी शरीराला नऊ  अ‍ॅसिडस आवश्यक असतात असे विज्ञान सांगते. यातला प्रश्न एवढाच आहे की या सर्व अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्ससह उच्च प्रतीची प्रथिनं कुठल्या आहाराद्वारे मिळवता येतील हा मुख्य प्रश्न आहे. या आहाराचा स्त्रोत योग्य आहे की अयोग्य हा देखिल महत्त्वाचा मुद्दा आहे.

आरोग्य आणि कल्याण या क्षेत्रात अग्रगण्य असलेली अ‍ॅमवे इंडिया ही कंपनी न्यूट्रिलाईट या आपल्या फ्लॅगशिप ब्रँडच्या माध्यमातून उच्च-गुणवत्तेचा आहार देण्याचा करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. न्यूट्रिलाईट हे निसर्ग आणि विज्ञानातल्या सर्वोत्तम गोष्टी एकत्र आणणारे उत्पादन आहे.

जगातल्या पहिल्या क्रमांकाची जीवनसत्त्वे आणि आहारातील पूरक तत्त्वे असलेले हे सर्वोत्तम उत्पादन आहे. नऊ दशकांहून अधिक काल न्यूट्रिलाईट वनस्पतींवर आधारित दृष्टीकोनाचे समर्थन करते आहे. न्यूट्रिलाईट ऑल प्लांड प्रोटिन पावडर आहारातल्या प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. ५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांसाठी हे सर्वात योग्य उत्पादन आहे.

वनस्पतींवर आधारित प्रथिनं का आवश्यक आहेत?

मांस, दुग्धजन्य आणि अंडी यासारखे प्राणीजन्य प्रथिनांचे स्त्रोत आहेत. ज्यांना पूर्व प्रथिनं मानलं जातं. असं असलं तरी वनस्पतीजन्य प्रथिनांची मागणी वाढत आहे. वनस्पतीजन्य आहार उद्योगाच्या दिशेने वाढणारा हा कल मानवी कल्याण, सामाजिक आणि पर्यावरणाच्या समस्या यांचा परिणाम आहे. संशोधनात हे सिद्ध झाले आहे की वनस्पतीजन्य आहार बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, एचबीए १ सी आणि कोलेस्ट्राॅलची पातळी कमी करु शकतात.

याच मानवी शरीराची हानीही होत नाही. विविध रोगांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या औषधांचे प्रमाणही यातून कमी होते. अल्परक्तताजन्य (इस्केमिक) हृदयरोगाचा मृत्यू दरही यातून कमी होतो आहे. सामान्य वनस्पतीजन्य प्रथिनांमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. त्यात कोलेस्टेरॉल नसून ते अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. यात लोह (आयर्न), मॅग्नेशियम आणि फायटोन्यूट्रिएंट्स सारखी खनिजेही भरपूर असतात.

बाजारात या प्रकारची जी उत्पादने आहेत त्यात अ‍ॅमवेची न्यूट्रिलाईट प्लांट प्रोटीन पावडर सर्वोत्तम आहे. ही 100% वनस्पती वर आधारित प्रथिन पावडर आहे. सोया, गहू आणि पिवळा वाटाणा या तिघांचे मिश्रण करून ही तयार केली जाते. ज्यांना आपल्या आहारात प्रथिनांच्या पावडरचे सेवन करायचे आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

पीडीसीएएसएस=1.0  असलेली दर्जेदार प्रथिने असल्याने ही पावडर पचण्यास हलकी आहे. न्यूट्रिलाईट ऑल प्लांट प्रोटीन पावडर मध्ये आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या तयार करता न येणारे नऊ आवश्यक अमिनो ॲसिड्स सारखे बाहेरून मिळणारे घटक असतात.

यात प्रथिनांचे प्रमाण उच्च आहे. प्रति 10 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये 8 ग्रॅम प्रथिने यातून मिळतात. बाहेरुन वेगळी घातलेली साखरही यात नसते. त्यामुळे पोषणातल्या त्रुटी यातून भरुन निघतात. या उत्पादनाची बीज ते पूरक आहार ही प्रक्रिया नऊ टप्प्यांतून पार पाडली जाते.

ॲमवेच्या मालकीच्या सुमारे ६००० एकरांच्या शेती आणि भागीदार शेतीच्या माध्यमातून ही उत्पादने घेतली जातात. कच्च्या मालापासून ते पॅकेजिंग केलेल्या उत्पादनांपर्यंत कडक गुणवत्ता नियंत्रण पाळले जाते. त्यातून उत्पादनांची शुद्धता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित होते.

आपल्या शरीरात प्रथिने अनेक भूमिका पार पाडतात. पेशी व ऊतींची वाढ, देखभाल आणि दुरुस्तीसाठी एक आवश्यक महापोषक द्रव्ये (मॅक्रोन्यूट्रिएंट) ॲमवे न्यूट्रिलाईटचे ऑल प्लांट प्रोटीन पावडरमधून निश्चित मिळतात. त्यामुळेच आता विचार नका करु. आजच आपल्या नियमित आहारातील पोषणातील त्रुटी भरून काढण्यासाठी आणि आरोग्यदायी व आनंदी जीवन जीवनासाठी ॲमवे न्यूट्रिलाईटचे ऑल प्लांट प्रोटीन पावडरचा वापर करा सुरु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com