आहार‘मूल्य’ : आरोग्याची गुढी आणि आहार

रोजच्या जीवनात आपण विभिन्न अन्नघटकांचा समावेश करत असतो; पण चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, ताण-तणाव इत्यादी गोष्टींमुळे आपले आरोग्य धोक्यात येते.
Diet
DietSakal
Summary

रोजच्या जीवनात आपण विभिन्न अन्नघटकांचा समावेश करत असतो; पण चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, ताण-तणाव इत्यादी गोष्टींमुळे आपले आरोग्य धोक्यात येते.

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

रोजच्या जीवनात आपण विभिन्न अन्नघटकांचा समावेश करत असतो; पण चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, ताण-तणाव इत्यादी गोष्टींमुळे आपले आरोग्य धोक्यात येते. जीवनशैलीशी निगडित आजार- उदाहरणार्थ, मधुमेह, रक्तदाब, पीसीओडी, इन्सुलिन रेझिस्टन्स हे सर्व आजार आज आपल्यासमोर येत आहेत.

गुढीपाडव्याला चालू होणारे आपले नवीन वर्ष, नवीन आशा घेऊन येत आहे. त्यातला महत्वाचा संकल्प आपण आपल्या आरोग्याविषयी करावा. आरोग्यविषयक संकल्प करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे

1) संकल्प करताना स्पेसिफिक उद्देश ठेवावेत. उदाहरणार्थ, HBAIC ची पातळी मर्यादित करणे, कोलेस्टेरॉलची पातळी मर्यादित करणे.

2) शरीराच्या हालचाली वाढवणे. उदाहरणार्थ, सकाळी व्यायाम केला, तरी दुपारी स्ट्रेचिंग/श्वसनाचे व्यायाम, पोहणे. चालायला जाणे किंवा संध्याकाळी टेकडी चढणे अशा हालाचाली वाढवण्याकडे कल ठेवावा.

3) फळे, भाज्या या ऋतुप्रमाणे लोकल विक्रेत्यांकडून खरेदी करून त्यांचा आहारात समावेश वाढवणे.

4) स्वतःच्या पोस्चरकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे. बरेच वेळा आपण ऑफिसमध्ये बसताना पाठीच्या कण्याला बाक काढून, खांदे पाडून बसतो. तेव्हा स्वतःच्या पोस्चरकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे. जेणेकरून आपल्याला चुकीच्या पोस्चरमुळे होणारे आजार टाळता येतील.

5) स्वतःचे वजन, बॉडी मास इंडेक्स, रक्ताचे रिपोर्ट्‌स यांच्या नियमित नोंदी ठेवताना आहार, व्यायाम, झोप यांचीसुद्धा नोंद ठेवावी.

6) नियमित पाणी प्यावे. डिहायड्रेशन किंवा पाण्याचा अभाव यामुळे भुकेमध्येसुद्धा वाढ होऊन, अतिखाणे होऊ शकते. म्हणून साधारणपणे दिवसाकाठी १२-१३ ग्लास पाणी प्यावे.

7) व्यायामात सातत्य व बदल करावेत. वेगवेगळ्या व्यायामाच्या पद्धतीमुळे शरीरातील स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते.

8) स्पर्धा फक्त स्वतःच्या शरीरातील बदलांशी करावी.

9) शरीराला त्याच त्याच प्रकारच्या व्यायामांची सवय होते, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे प्रकार करावेत. कधी व्यायामपद्धतीत बदल करावा, कधी कालावधीमध्ये, तर कधी इन्टेसिटीमध्ये फरक करावा.

10) ताण-तणाव कमी करण्यासाठी एखादा छंद जोपासावा. पाळीव प्राणी, झाडे, लहान मुले यांच्याबरोबर आठवड्याला एखादा तास घ्यावा.

नवीन वर्षातील आहारातील काही महत्त्वाचे संकल्प

  • ताजे व पौष्टिक अन्नाचे सेवन.

  • मैदायुक्त, साखर, मीठयुक्त पदार्थ टाळावेत.

  • दिवसभरात कमीत कमी एखादे फळ खावे.

  • जेवताना कोण्याताही प्रकारचा स्क्रीन म्हणजे टीव्ही, मोबाईल, कॉम्पुटर टाळावा.

  • शांतपणे चावून घास गिळावेत- जेणेकरून पचनाला मदन होईल.

  • पाण्याबरोबरच आहारात लिंबूपाणी, ताक, सूप, नारळपाणी यांचा समावेश करावा.

  • प्रथिनांसाठी आहारात डाळी, उसळी, चिकन, अंड्यातले पांढरे, दूध, दही, पनीर, सीड्स, बदाम, अक्रोड यांचा समावेश करावा. सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ यापासून वनस्पतीजन्य प्रथिने मिळू शकतील.

  • फॅट, सॅच्युरेटेड फॅट्स टाळून आहारात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स उदाहरणार्थ, सीड्स, बदाम, अक्रोड यांचा वापर करावा.

  • जेवणाच्या व झोपेच्या वेळा पाळाव्यात.

  • रिकाम्या पोटी व्यायाम करणे टाळावे. व्यायामाला जाताना एखादे फळ, सुका मेवा, दूध इत्यादीसारखे पदार्थ घ्यावेत.

हे संकल्प नवीन वर्षासाठी आपण केले, तर आपले आरोग्य आपण योग्य प्रकारे राखू शकू. व्यायामाची, योग्य आहाराची; चांगल्या व वेळेवर झोपेच्या सवयींची गुढी आपण सर्वांनी मिळून उभी केली, तर हे येणारे नवीन वर्ष सर्वांना आरोग्याचे, समृद्धीचे, भरभराटीचे जाईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com