आहार‘मूल्य’ : शरीराचे डिटॉक्स

शरीरामध्ये अन्नाचे पचन, ताण-तणाव, अपुरी झोप, जंक फूडचा वापर इत्यादींमुळे विषारी पदार्थ तयार होतात.
Body Detox
Body Detoxsakal

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

शरीरामध्ये अन्नाचे पचन, ताण-तणाव, अपुरी झोप, जंक फूडचा वापर इत्यादींमुळे विषारी पदार्थ तयार होतात. शरीर डिटॉक्सिफिकेशनने ते पदार्थ बाहेर टाकत असते; पण खालील कारणांमुळे ही प्रक्रिया मंदावते किंवा बिघडते :

१) प्रोसेस्ड फूडचा वापर

२) तळलेल्या, मैदायुक्त पदार्थांचा वापर

३) अपुरी झोप व जागरणे

४) व्यायामाचा अभाव

५) मद्य व धूम्रपान

६) डिहायड्रेशन

शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया चांगली होण्यासाठी रोजचा ४०-५० मिनिटांचा व्यायाम : व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. घाम येतो व त्याद्वारे शरीरातील साठलेली विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

  • पूर्णवेळची शांत झोप : शक्यतो जागरणे टाळावीत- कारण जागरणांमुळे शरीरशुद्धी करण्याची क्रिया मंदावते. किमान ७-८ तासांची शांत झोप महत्त्वाची आहे

  • परिपूर्ण आहार : रोजचा आहार हा समतोल व परिपूर्ण असावा. कोणत्याही प्रकारचा फॅड डाएटचा वापर न करता रोजच्या रोज सर्व प्रकारची न्युट्रियंट्स मिळावीत, यासाठी प्रयत्नशील असावे.

  • आहारामध्ये ऋतूप्रमाणे व स्थानिक भाज्या व फळांचा वापर करावा. फळे खाताना ती चावून खावीत. चोथा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदतरूप असतो.

  • किमान १०-१२ तास पाणी प्यावे. आहारामध्ये ताक, भाज्यांचे सूप, कढण, ब्रॉथ यांचा वापर करावा.

  • जेवणामध्ये ओवा, जिरे, धने, बडीशेप इत्यादींसारख्या मसाल्यांच्या पदार्थाचा वापर करावा- जेणेकरून अन्नाचे पचन चांगले होईल व शरीरातील साचलेली घाण बाहेर टाकली जाईल.

  • जीवनसत्त्व कयुक्त पदार्थ उदा-लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादी पदार्थाचा समावेश आहारात करावा.

  • साखरेचा वापर मर्यादित करावा. साखरेऐवजी खारीक पावडर, खजूर, काळ्या मनुका इत्यादी पदार्थांचा वापर करावा.

  • मीठयुक्त पदार्थ- उदा सॉस, ड्रेसिंग, केचप, पापड, फरसाण, चिप्स इत्यादी पदार्थाचा वापर टाळावा.

  • चोथ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सालासकट धान्ये, अंकुरीत धान्ये, भाज्या, फळे यांचा वापर करावा. मैदायुक्त पदार्थ टाळावेत.

शरीरशुद्धीसाठी

  • दिवसाची सुरवात १ कप कोमट पाणी + १ चमचा आवळ्याचा रस

  • नाश्ता - मोड आलेली वाफवून कडधान्ये व त्याचे पदार्थ. उदाहरणार्थ, डोसा, इडली + नारळाची चटणी

  • दुपारी ११ वाजता - फळ

  • दोन्ही वेळच्या जेवणामध्ये भाज्या, डाळी, उसळींबरोबरच कोशिंबीर, ताकाचा वापर करावा.

  • जेवल्यानंतर अर्धा चमचा ओवा बडीशेप खावी.

  • रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी, पेज इत्यादी पदार्थांचा वापर करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com