आहार‘मूल्य’ : थंडीसाठीची सुपरफूड्स

दिवाळी उजाडली, की हवेमध्ये गारठा जाणवू लागतो आणि याच दिवसांत थंडीमुळे वेगवेगळे आजार उद्भवू लागतात.
superfoods
superfoodssakal

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

दिवाळी उजाडली, की हवेमध्ये गारठा जाणवू लागतो आणि याच दिवसांत थंडीमुळे वेगवेगळे आजार उद्भवू लागतात. या दिवसांत बाजारात मिळणाऱ्या काही सुपरफूड्सबाबत आपण माहिती जाणून घेऊ.

ओली हळद

ओल्या हळदीमध्ये अँटिऑक्सिंड्टस असतात. संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी करते. रोगप्रतिबंधकशक्ती वाढवते. रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

गाजर

उत्तम चोथायुक्त असते. जीवनसत्त्व ‘अ’युक्त. त्वचेचं आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदतरूप. आतड्यांचं आरोग्य सुधारते.

मटार

मटारपासून चोथा आणि वनस्पतिजन्य प्रथिनं मिळण्यास मदत होते. त्यातील जीवनसत्त्व ‘क’मुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्यातील फ्लेवोनॉइड्स अँटिऑक्सिडंट्स म्हणून मदतरूप ठरतात.

आवळा

जीवनसत्त्व ‘क’युक्त आवळा, केसांचा पोत सुधारतो. लोहाच्या शोषणास मदतरूप ठरतो. अँटिऑक्सिडंट्स मिळतात. रोगप्रतिबंधकशक्ती वाढण्यास मदत होते. त्वचेचं आरोग्य कोलॅजेनच्या निर्मितीला पोषक असल्यामुळे सुधारतं.

संत्री

जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’युक्त असतं. चोथ्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. संत्री युरीक ॲसिड कमी करतात. उष्मांक कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.

स्ट्रॉबेरी

या दिवसात मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीत जीवनसत्त्व ‘क’ आणि चोथ्याचं प्रमाण जास्त असतं. स्ट्रॉबेरीत अँटिऑक्सिडंट्स असतात आणि त्या रक्तातील युरीक ॲसिडचं प्रमाण कमी करण्यास मदतरूप असतात.

बाजरी

हे मिलेट धान्य असून त्यापासून लोह व चोथा मिळण्यास मदत होते.

मासे

उत्तम प्रकारची प्रथिनं मिळतात, पचनास सोपे असतात आणि जीवनसत्त्व ‘ई’युक्त. अँटिऑक्सिडंट्स मिळतात. सांध्यांच्या ताकदीसाठी उपयुक्त.

तीळ

प्रथिनं आणि आवश्यक असे फॅटी ॲसिड्स मिळतात, हाडांच्या ताकदीसाठी कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ‘ई’ मिळतं.

पापडी शेंगा

सुरती पापडी, वाल पापडी इत्यादी प्रकारच्या शिरायुक्त शेंगा या चोथायुक्त असतात. आतड्याचं आरोग्य सुधारण्यास मदतरूप. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त. पोट भरलेलं राहण्याची भावना वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com