
Legumes and health: नव्या वर्षात निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. तसेच काहीजण सकाळी नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खातात. रिकाम्या पोटी मोड आलेले कडधान्य खाणे अनेकांना आवडते. यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिने, खनिजे, अँटिऑक्सीडट्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार मोड आलेले कडधान्य खाणे पोषक मानले जाते. पण त्याचे आरोग्यादीय फायदे मिळविण्यासाठी पुढील काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.