

Understanding Fatigue and Low Weight
sakal
प्रश्न: माझं वजन कमी आहे आणि सतत थकवा जाणवत राहतो. मला एका व्यक्तीने सल्ला दिला की, गरम पाण्यामध्ये डिंक व हळद घालून खा. तसं करणे योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
- संतोष प्रधान, ठाणे
उत्तर : डिंकाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बाजारांमध्ये मिळतात. पण बाभळीचा डिंक हा आरोग्याकरिता सगळ्यात उत्तम असतो. बाजारातून चांगल्या प्रतीचा डिंक आणावा. त्याला साजूक तुपामध्ये तळून त्याची लाही करून वापरलेला जास्त उत्तम राहतो. कच्चा डिंक पचनाच्या दृष्टीने चांगला नसतो. काही कृतींमध्ये गोंद कतिरा हा पाण्यामध्ये भिजवून शरीरात शीतलता आणण्याकरता वापर करतात. पण त्याचे फायदे बाभळीच्या डिंका एवढे नसतात. बाभळीचा तळलेला डिंक लाडूमध्ये किंवा एखाद्या गोड पदार्थात वापरण्यास घेता येतो. ‘संतुलन’चे मॅरोसान व तसेच आत्मप्राश हे दोन्हीही ताकदीकरिता तुम्ही घेऊ शकता. शक्य झाल्यास आहार, उपचार दोन्हींचाही उपयोग ताकत वाढविण्याकरिता कशाप्रकारे करता येऊ शकेल, याबद्दल मार्गदर्शन घेतलेले जास्त उत्तम राहील.