आयुर्वेद : जीवनाची विद्या

आयुर्वेद हे तब्बल ५००० वर्षं जुने असलेले भारताचे स्वदेशी प्राचीन वैद्यकीयशास्त्र असून, तो अथर्व वेदामधील उपवेद आहे.
Ayurveda
Ayurvedasakal

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

इथून पुढील लेखांमध्ये आपण निरनिराळ्या पॅथीजबद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आयुर्वेदापासून.

आयुर्वेद हे तब्बल ५००० वर्षं जुने असलेले भारताचे स्वदेशी प्राचीन वैद्यकीयशास्त्र असून, तो अथर्व वेदामधील उपवेद आहे .

त्याचा शब्दश: अर्थ : आयु:=जीवन, वेदा:=विद्या म्हणजे जीवनाची विद्या असा होतो. आयुर्वेदाच्या सखोल आणि शास्त्रशुद्ध अशा आठ शाखा आहेत :

  • काया चिकित्सा (इंटर्नल मेडिसिन )

  • शल्य तंत्र (शस्त्रक्रिया)

  • शालाक्य तंत्र (कान नाक घसा)

  • कौमारभ्रूत्य (बालरोग)

  • अगद तंत्र (toxicology)

  • भूत विद्या (मानसोपचार)

  • रसायन चिकित्सा (rejuvenation, वयोवृद्ध)

  • वाजीकरण (sexology)

आयुर्वेदातील वैशिष्ट्ये -

आयुर्वेद वाचल्यानंतर त्याचा खरा गाभा समजतो. त्याची व्याप्ती, खोली, विस्तार, तपशील, सर्वसमावेशक आणि परिपूर्ण दृष्टिकोन, प्रतिबंधक, उपचारात्मक तत्त्वे महत्त्वाची आहेत.

आयुर्वेदात त्याकाळी अनेक शस्त्रक्रियांचा उल्लेख केलेला आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा अत्याधुनिक शस्त्रक्रियादेखील त्यामध्ये समाविष्ट आहेत. याचसोबत मानसिक स्वास्थ्य, आहाराचे नियम, योग्य दिनचर्या इतकंच नाही तर ऋतुचर्या (म्हणजे बदलत्या ऋतूप्रमाणे आपला दिनक्रम कसा बदलावा) या गोष्टीसुद्धा आहेत.

आज आपण ज्याला ‘डिटॉक्स’ म्हणतो, त्या शरीर शुद्धी क्रिया आहेत. पंचकर्म हा त्याच्यातलाच एक भाग आहे. चांगली संतती होण्यासाठी काय करावं, गर्भसंस्कार आणि असंख्य आजारांवर औषधोपचार आयुर्वेदात आढळतात! इतकंच कशाला ‘जनपदोध्वंस’ म्हणजेच महासाथी (उदा. कोविड) या आपण निसर्गाचा ऱ्हास केल्याने कशा होतात आणि त्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून कशी ठेवावी हेही सांगून ठेवले आहे.

आपल्याला आजच्या काळात वाटणारे मधुमेह, लठ्ठपणा (स्थौल्य) या आजारांचाही उल्लेख आयुर्वेदात आहे आणि त्यांच्यावरचे उपायदेखील. त्याचप्रमाणे माणसाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी सर्वोच्च गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.

आयुर्वेदामध्ये मानवी जीवनरचना अभ्यासताना एक सुंदर वाक्य म्हटले आहे : यत पिंडे तत् ब्रह्मांडे - म्हणजेच जे जे या शरीरात आहे ते सर्व या ब्रह्मांडात आहे आणि त्या उलटसुद्धा जे ब्रह्मांडात आहे ते सर्व या शरीरात आहे.

आपलं शरीर या सर्व ब्रह्मांडाचा, आजूबाजूच्या निसर्गाचा भाग आहे व त्याप्रमाणे पंचमहाभूतांनी (अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश) बनले आहे.

या पंचमहाभूतांच्या संयोगाने निर्माण होतात तीन दोष - वात (वायू आणि आकाशतत्त्व), पित्त (जल आणि अग्नितत्त्व) आणि कफ (पृथ्वी आणि जल तत्त्व). या दोषांच्या कार्यानं आपली सर्व शरीरक्रिया सदैव कार्यरत असते. याबद्दलची रंजक आणि सखोल माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com