

Ayurvedic remedies for child sleep issues and fertility support for couples.
Sakal
प्रश्न ः माझा मुलगा अडीच वर्षाचा आहे. तो रात्री अजूनही शांत झोपत नाही. अनेकदा रडत उठतो. तसेच कधीतरी रात्री दातसुद्धा खातो. एरवीही तो खूप चिडचिड करत असतो. कृपया उपाय सुचवावा.
- सौ. नीलाद्री साठे.
उत्तर ः या वयातल्या बऱ्याचशा मुलांना पोटामध्ये कृमी असतात. त्यामुळे रात्रीची शांत झोप न येणं, चिडचिड होणं अशा प्रकारचे त्रास आपल्याला दिसू शकतात. त्याला रोज संतुलनचे बाल हर्बल सिरप एक ते दोन चमचे सकाळ संध्याकाळ द्यावे. त्याच बरोबरीने संतुलनच्या विडंगारिष्ठ सुद्धा एक-एक चमचा कोमट पाण्याबरोबर मिसळून जेवणानंतर द्यावे. रात्री झोपण्याआधी त्याला मऊ भात करून त्याच्यामध्ये साजूक तूप व दूध घालून मिठाशिवाय खायला द्यावे. त्यामुळे रात्री शांत झोप लागायला मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी त्याला एक चमचा संतुलन रिलॅक्स सिरप देण्याचाही फायदा होऊ शकेल. मुलांच्या विकासामध्ये पुरेशी झोप असणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे झोप शांत व्हायला मदत नसेल मिळत तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.