Back Pain : तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतेय पाठदुखी, जाणून घ्या कारणे अन् लक्षणे

Back Pain : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांना भेडसावणारा महत्त्वाचा एक विषय म्हणजे पाठदुखी होय.
Back Pain
Back Painesakal

Back Pain : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांना भेडसावणारा महत्त्वाचा एक विषय म्हणजे पाठदुखी. त्यामुळे दैनंदिन कामात प्रचंड अडथळे येतात. फिरायला जाणे, घरात काम करणे, वाहन चालविणे या प्रत्येक ठिकाणी पाठदुखी पाठ सोडत नाही. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होऊन आयुष्यातील रंगाचा बेरंग होत असल्याचे चित्र पुढे येत आहे.

तरुणांना इतर कोणतेही आजार बहुधा नसतात. त्यांचा रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाचे ठोके याचं कुठंच काही बिघडलेलं दिसत नाही. पण, पाठदुखी मात्र अशी असते की अक्षरशः अंथरुणावर झोपण्याशिवाय काहीच करू शकत नाही. एकीकडे, असह्य वेदना होत असतात आणि दुसरीकडे सगळ्या प्रयोगशाळेतील चाचण्या व्यवस्थित दिसतात, यामुळे नेमकं काय झालंय, याचं निदान आव्हानात्मक ठरते.

यातील बहुतांश तरुणांना कमरेतील मणक्यांच्यामध्ये असलेल्या चकतीच्या उसवण्यामुळे होणारी पाठदुखी सर्वाधिक असल्याने मणक्याची शस्त्रक्रिया स्थानिक भुलीमध्ये करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Back Pain
Yoga For Back-Neck Pain : मान आणि पाठीच्या वेदनांनी त्रस्त आहात? मग ‘या’ २ योगासनांची घ्या मदत

मणक्याची चकती उसविल्याची लक्षणे

  • रुग्ण एका जागी स्वस्त बसू शकत नाही

  • बसल्यावर किंवा उभे राहिल्यावर कमरेमध्ये कायम दुखत राहाते

  • खोकला, शिंक आल्यावरही कमरेतून कळ येते

  • रुग्ण बेचैन होऊन कामात लक्ष लागत नाही

पाठदुखीची इतर प्रमुख कारणे

  • जंतुसंसर्ग

  • फ्रॅक्चर्स

  • अपघातामुळे झालेली इजा

  • मणक्याला बसलेला मार

तरुणांमधील पाठदुखीचे मूळ बहुतांश कमरेतील मणक्यांच्या चकत्यांमध्ये असते. त्या चकत्या उसविल्याने त्यातून झिरपणारे रसायन आतील शिरांना झोंबते. त्यामुळे तरुण पाठदुखीने बेजार होतात.अशा रुग्णांच्या चकतीवर फक्त स्थानिक भूल देऊन त्या उसविल्याच्या अचूक जागी चकती दुरुस्त करण्याची शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेत रुग्ण जागा असतो.

रुग्णाच्या पाठीच्या बाजूने दोन मणक्यांमध्ये दुर्बीण घातली जाते. त्या माध्यमातून प्रत्यक्ष नजरेने तपासणी केली होते. त्यातून पाठदुखीच्या त्रासाचं नेमकं कारण काय आहे, कुठे आहे, किती आहे? याची पडताळणी अतिशय सोप्या पद्धतीने करता येते.

या ठिकाणी फिजिओथेरपी निदानाअभावी उपयुक्त ठरत नाही. दुर्बिणीने ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आणि बिनभुलेची करता येते. त्यातून रुग्णाची पाठदुखी कायमस्वरूपी थांबते, अशी माहिती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सचिश्‍चंद्र गोरे यांनी दिली.

तरुणांमधील पाठदुखी ही मोठ्या प्रमाणात दिसणारे दुखणे आहे, हे आधी आपण मान्य केले पाहिजे. या दुखण्यामुळे तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, व्यवसाय ठप्प झाले असून, संसारही उद्‍ध्वस्त होत आहेत. त्यामुळे योग्य तज्ज्ञांकडून याचे अचूक निदान करणे आवश्यक आहे.

‘एमआरआय’ स्कॅन सामान्य दिसतो. त्या चकतीचे उसवणे दिसत नाही. त्यामुळे उपचाराच्या दिशेने पाऊल टाकले जात नाही. त्यासाठी अचूक निदान आणि गरजेनुसार स्थानिक भूल देऊन दुर्बिणीतून मणक्याची प्रभावी शस्त्रक्रिया हा त्यावर रामबाण उपाय ठरला आहे.

- डॉ. सचिश्‍चंद्र गोरे, अस्थिरोगतज्ज्ञ, अध्यक्ष, मिशन स्पाइन फाउंडेशन

Back Pain
Back Pain : 'या' चुकीच्या सवयींमुळे वाढते पाठदुखीची समस्या, वेळीच द्या लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com