Winter Health Care: थंडीत बरेच जण अंघोळीच्या वेळी करताय 'ही' एक चूक, वाढतोय हार्ट अटॅकचा धोका | Heart Attack in Winter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Attack in Winter

Heart Attack in Winter: थंडीत बरेच जण अंघोळीच्या वेळी करताय 'ही' एक चूक, वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

Winter Health Care : सर्वत्र सध्या कडाक्याची थंडी पडेतय. त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाणही वाढलंय. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या काही चुकांमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

बरेच लोक कडाक्याच्या थंडीतही थंड्या पाण्याने अंघोळ करतात. त्यानेही आरोग्याला धोका होतो. तर बरीच लोक थंडीमुळे कडक गरम पाण्याने अंघोळ करतात. असे तुम्हीही करत असाल तर हे आवर्जून वाचा.

थंडीत आपल्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात. आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दाब निर्माण होतो. अशा वेळी थंड्या पाण्याने किंवा अति गरम पाण्याने अंघोळ करणे फार घातक ठरू शकते.

कोमट पाण्याने अंघोळ करणे कधीही सुरक्षित

हेल्थ एक्सपर्टच्या मते, कोमट पाण्याने शरीराला एकदम झटका बसत नाही. तसेच शरीराचं तापमानही नियंत्रित राहाते. ब्लड सर्क्युलेशनही व्यवस्थित राहाते.

हेही वाचा: Daily Bath Habit : रोज अंघोळ करणे गरजेचे आहे काय? तज्ज्ञांचं मत वाचून तुम्हीही अवाक व्हाल

थंडीत थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका

थंडीत थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने रक्तदाब अचानक वाढतो. हृदयाचे सगळे अवयव वेगाने काम करू लागतात. आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन थांबतं. तेव्हा थंडीत थंड्या पाण्याने अंघोळ करू नका.

एकीकडे एका स्टडीमधून असे दिसून आले आहे की, थंडीत थंड्या पाण्याने अंघोळ केल्याने मेटॉबोलिझम, रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे फिटनेस फ्रिक थंड्या पाण्याने अंघोळ करतात. मात्र हे केवळ फिजीकली फिट व्यक्तींनाच लागू होतं.

थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी हे उपाय करा

डॉक्टरांच्या मते, थंडीत हलके जेवण जेवायला हवे. तसेच गरम कपडे घालावे. कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास नियमित गोळ्या घ्यायला हव्यात.