Health: बीयर पिणाऱ्यांचा फायदा तर न पिणाऱ्यांचं नुकसान! तज्ज्ञांचा गजब दावा.. एकदा वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beer Benefits

Health: बीयर पिणाऱ्यांचा फायदा तर न पिणाऱ्यांचं नुकसान! तज्ज्ञांचा गजब दावा.. एकदा वाचाच

Beer Benefits: मद्यपान करणं शरीरासाठी धोकादायक आहे असे अनेक ठिकाणी आपण वाचत आणि ऐकत असतो. मात्र तज्ज्ञांचा असा दावा आहे की अल्कोहोल मर्यादित प्रमाणात घेतल्यास त्याचे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. वाईनचे अनेक प्रकार आहेत. हार्डड्रिंक, बीयर, जिन इत्यादी. अलीकडेच तज्ज्ञांनी बीयर संदर्भात एक दावा केलाय. या दाव्यानुसार रात्री बीयर पिल्याने डिमेंशियाचा धोका कमी होतो.

काय सागतं तज्ज्ञांचं रिसर्च?

६० वर्षांवरील वृद्धांमध्ये एकूण २५ हजार लोकांवर हे रिसर्च केल्या गेलं. यामध्ये दिवसातून ९४६ मिली बीयर पिणाऱ्या लोकांचा आकडा मोठा होता. ऑस्ट्रेलियामध्ये शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यसातून हे प्रमाण दिसून आले. रिसर्चमधून असं निष्कर्ष पुढे आलं की, न पिणाऱ्यांमध्ये डिमेंशियाचा धोका अधिक असतो. डिमेंशिया म्हणजे असा आजार जो साठ वर्षांवरील वृद्धांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. रिसर्चर्सच्या म्हणन्यानुसार जे लोक मद्यपान करताना आढळले त्यांच्यात डिमेंशियाची लक्षणे नव्हती. मात्र प्रमाणाबाहेर बीयर पिणाऱ्यांमध्ये धोकाही सांगितला गेलाय.

हेही वाचा: Health : जाणून घ्या,गर्भवती होण्याचे योग्य वय

३० वर्षांत तीन टक्के वाढला डिमेंशिया

गेल्या तीस वर्षांत डिमेंशियाचा धोका ३० टक्के वाढल्याचे डॉ. लुईस मेवटन आणि त्यांच्यासोबत या विषयावर अभ्यास करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. जगभऱ्यात १० लोकांपैकी ४ लोकांमध्ये डिमेंशिया दिसून आला.

हेही वाचा: ABHA Health Card : मुख्यमंत्री शिंदेंनी आवाहन केलेल्या 'आभा कार्ड' चा आपल्याला काय फायदा होणार ?

शास्त्रज्ञांच्या मते मीडियम मात्रेत दारू मेंदूमध्ये अनेक निरर्थक गोष्टींचा साठा होण्यापासून थांबवते. बहुतांश लोकांमध्ये हेच अनेक रोगांचं महत्वाचं कारण ठरतं. रिसर्चमध्ये मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे बघितल्या गेले. त्यामुळे मध्यम प्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांचं आरोग्य चांगलं असतं.

टॅग्स :BenefitsWinebeerhealth