Body Massage : सतत छोट्या छोट्या गोष्टीवरुन स्ट्रेस येतो? मग आठवड्यातून एकदा करा बॉडी मसाज

शरीराची मालिश करणे झोप आणि सुखकारक तसेच त्वचा आणि रक्ताला स्वच्छ करणारे आणि वात कफ नाशक आहे.
Body Massage
Body Massagesakal

Body Massage : आपले शरीर अनेक स्नायूंनी बनलेले आहे ते स्नायू मोकळे करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. जरी आपण ग्रामीण भागातले असलो तर सहसा आपल्या शरीराची हालचाल तर होतेच म्हणून आपल्याला वाटेल की आम्हाला व्यायामाची काय गरज, पण व्यायाम हा आवश्यक असतोच. त्याच बरोबर मालिश ही सुद्धा तितकीच गरजेची गोष्ट आहे.

पूर्वीच्या काळापासून आपण पाहत आलोय की लहान मुलांची तेलाने मालिश केली जाते, आणि असे केल्या केल्या लहान मूल अगदी शांत झोपी जाते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मुलांची मालिश केल्यास त्यांची शारीरिक वाढ ही अतिशय लवकर होते. (Body Massage is best way to drop stress healthy lifestyle)

आज आपण पाहू प्राचीन काळापासून चालत आलेले मालिश म्हणजेच स्पर्श चिकित्सा पद्धत. या पद्धतीने मोठे मोठे आजार सुद्धा दूर होतात. अर्धांगवायू सारखे आजर तर ऍलोपॅथिक औषधाने बरे होतच नाहीत त्यांना मसाज व निसर्गोपचार आणि थोडी मेहनत पूर्णपणे आजार दूर करू शकते.

संवाहन श्रमहरं व्रस्यं निद्रा सुख प्रदम् । मांसा सृक्त्यक् प्रसन्नत्वम् कुर्याहातकफाप्रहमू ।।

म्हणजेच शरीराची मालिश करणे श्रमनाशक, धातूंना पुष्ट करणारे, झोप आणि सुखकारक तसेच स्वशोच्छास व त्वचा आणि रक्ताला स्वच्छ करणारी आणि वात कफ नाशक आहे.

Body Massage
Heart Health : ‘गोल्डन अवर’ म्हणजे काय? हृदविकाराच्या झटक्यानंतर का ठरतो महत्वाचा? वाचा सविस्तर

मसाज चे फायदे :

१. तणाव दूर करण्यास मदत करते.

२. मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे दूर करते.

३. ब्लडप्रेशर व्यवस्थित ठेवतो.

४. शरीराच्या आतील दुखणे नाहीसे होते.

५. इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते.

६. कमरेत होणारे दुखणे नियंत्रित करते.

७. यामुळे आपल्याला झोप देखील चांगली लागते.

- डॉ अमित भोरकर

(न्युट्रीशनिस्ट) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com