सोनू निगमला नेमकं झालंय तरी काय? आवाजावरही परिणाम झाल्याचा केलाय खुलासा; VIDEO VIRAL

प्रसिद्ध गायक Sonu Nigam ने नसांच्या त्रासामुळे झालेल्या आरोग्य समस्येबाबत आणि त्याचा त्याच्या आवाजावर झालेल्या परिणामाबाबत खुलासा केला आहे.
Sonu Nigam Health Scare

Sonu Nigam Health Scare

sakal

Updated on

"सूरज हुआ मद्धम, कल हो ना हो, तुमसे मिलके दिल का है हाल" सारख्या गाण्यांनी लाखो लोकांची मनं जिंकणारा बॉलिवूडमधला लोकप्रिय सिंगर सोनू निगम आजच्या पिढीच्या मनावरही तेवढंच राज्य करतो. मात्र नुकतंच त्यांनं चाहत्यांना धक्का देणारी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तीव्र वेदना देणाऱ्या नसांच्या समस्येशी झुंज देत असून त्यासाठी त्याला MRI, CT Scan आणि अनेक औषधांचा आधार घ्यावा लागत आहे.

इतकंच नाही तर या उपचारांचा परिणाम त्यांच्या घशावरही झाला असल्याचं त्याने सांगितलं. प्रकृती ठीक नसतानाही त्याने चाहत्यांसाठी परफॉर्म करण्याचा अट्टहास सोडलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com