तर काय?

माझे वय ४८ वर्षे आहे. गेल्या आठ महिन्यांपासून माझ्या दोन्ही हातांना कंप येतो आहे.
Both hands tremble
Both hands tremblesakal

माझे वय ४८ वर्षे आहे. गेल्या आठ महिन्यांपासून माझ्या दोन्ही हातांना कंप येतो आहे. चहाचा कप उचलताना, सुरीने कापताना, पाण्याचा ग्लास उचलताना कंप येतो, इतर वेळी कंप जाणवत नाही. सध्या काही काळजीचे कारण नाही. पण त्रास वाढला तर परत दाखवायला यावे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आपल्याला काही प्रतिबंधात्मक करता येईल का?

- निकिता पाटील, कोल्हापूर

उत्तर - हातांना कंप येणे वातदोष वाढल्याचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. शक्य असल्यास संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारख्या तेलाचा आठवड्यातून ३-४ वेळा संपूर्ण शरीराला हलक्या हाताने मसाज करावा. बरोबरीने रात्री झोपताना संतुलन कुंडलिनी तेलासारखे एखादे सिद्ध तेल खालून वर या दिशेत हलक्या हाताने पाठीच्या मणक्यावर जिरवावे तसेच संपूर्ण पाठीलाही लावावे, जे नसांना ताकद द्यायला व नसा मोकळ्या करायला मदत करू शकेल. बरोबरीने संतुलन वातबलसारख्या गोळ्या नियमित घेण्याचा फायदा होऊ शकेल. गुग्गुळाचा एखादा कल्पसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे उपयोगाचे ठरू शकेल. यात केल्या जाणाऱ्या वातशामक बस्तीमुळे उत्तम फायदा होताना दिसतो. एकदा तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे योग्य ठरेल.

माझे वय ३५ वर्षे आहे. गेली एक-दीड वर्षे मला रोज सकाळी एक लिटर कोमट पाणी पिण्यावरच पोट साफ होण्याची सवय लागलेली आहे. मध्यंतरी तुमचा व्हिडिओ पाहिला व त्यात कळले की अशा प्रकारे पाणी पिणे चांगले नसते. रोज पोट साफ होण्यासाठी काय करावे?

- प्रिया विद्वत, पुणे

उत्तर - खरे तर रोज सकाळी उठल्यावर आपोआप आवेग येणे उत्तम. शरीरात एकाच वेळी जास्त प्रमाणात पाण्याचा अतिरेक केल्याने अपचनाचा त्रास वाढताना दिसतो. त्यामुळे एकदम जास्त पाणी पिण्यापेक्षा दिवसभर तहान लागेल तसे थोडे थोडे पाणी पिणे श्रेयस्कर ठरते. तसेच रात्री झोपताना एक कप कोमट पाणी दोन चमचे साजूक तूप व एक सैंधव मीठ घालून घेतलेले बरे. याने पोट साफ व्हायला मदत मिळते. पचन व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने जेवणानंतर संतुलन अन्नयोग गोळ्या घेणे सुरू करावे. रात्री झोपताना सॅनकूल चूर्ण किंवा संतुलन अविपत्तिकर चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेण्याचा फायदा मिळू शकेल. आठवड्यातून २-३ वेळा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे एखादे तेल पोटावर हलक्या हाताने चोळावे. तेल कोमट केल्यास फायदा मिळू शकेल. घरी बनविलेले साजूक तूप, भिजविलेल्या काळ्या मनुका, भिजवलेले अंजीर घेण्याचा फायदा पोट साफ होण्यासाठी होऊ शकेल. सकाळी सूर्योदयापूर्वी एका नियमित वेळी उठल्यास काही दिवसांत रोज सकाळी शौचाला लागण्यास मदत होऊ शकते. तेव्हा ही सवय लावून घेण्याचा प्रयत्न करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com