Brain Aneurysm: मेंदूतील ‘टाइमबाँब’ : ॲन्युरिझम

Brain Aneurysm Warning Signs You Should Never Ignore: मेंदूतील ‘टाइमबाँब’ म्हणजे काय? ॲन्युरिझमची लक्षणे आणि धोके जाणून घ्या
What Is a Brain Aneurysm Learn About Symptoms Risk Factors Diagnosis and Treatment of This Serious Brain Blood Vessel Condition

What Is a Brain Aneurysm Learn About Symptoms Risk Factors Diagnosis and Treatment of This Serious Brain Blood Vessel Condition

sakal

Updated on: 

मिसेस नेने माझ्या क्लिनिकमध्ये आल्या त्या प्रश्न घेऊन नव्हे, तर काय करायचं ते ठरवूनच! ‘‘डॉक्टर, माझ्या मानेतल्या डिस्कचं ऑपरेशन करा. आता हे दुखणं सहन होत नाही.’’

मिसेस नेने वय ४५ वर्षांच्या. हातात जाडजूड फाइल. गेल्या सहा महिन्यांत त्यांना तीन वेळा अचानक मानेत तीव्र वेदनांचा झटका आला होता. प्रत्येक झटका कोणतीही पूर्वसूचना न देता, अगदी अचानक आलेला. अचानक मानदुखी, डोक्याच्या मागे आणि खांद्यांमध्ये प्रचंड वेदना. सहन होण्यापलीकडच्या. प्रत्येक वेळी त्या आधी फॅमिली डॉक्टरकडे गेल्या, मग ऑर्थोपेडिक सर्जनकडे. त्यांना पेनकिलर्स आणि सर्व्हायकल कॉलर देण्यात आली होती. तीन वेळा. प्रत्येक वेळी दुखणं कमी झालं आणि आयुष्य पुढे चालू राहिलं. चौथ्या झटक्यानंतर मात्र नशिबाने त्या आमच्याकडे आल्या. मात्र, तपासणी करताना कहाणी जुळत नव्हती. त्यांची मान नुसती दुखत नव्हती; ती ताठ झाली होती. हनुवटी छातीकडे वाकवण्याचा प्रयत्न करताच मान विरोध करत होती. त्या दिवशी सकाळी त्यांना उलटी झाली होती. डिस्कमुळे असं होत नाही. मेंदूभोवतीच्या जागेत, सीएसएफ या द्रवात रक्त आलं, तर असं होतं.

Loading content, please wait...