
Breast cancer diagnosis treatment in India : बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांत कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. महिलांच्या सर्वाधिक आढळून येणाऱ्या स्तनांच्या कर्करोगात गेल्या काही वर्षांपासून मोठी वाढ झाली आहे. स्तनांचा कर्करोग आढळणाऱ्या ३० टक्के इतके स्त्रियांचे प्रमाण आहे. आजार जेवढा लवकर ओळखून उपचार केले जातील तेवढे तो बरा होण्याचे प्रमाण वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कर्करोगाचे प्रमाण भारतात वाढत आहे. घटता जननदर, उशिरा मुले होणे, स्तनपान न करणे, वाढता लठ्ठपणा, भाजीपाल्यातील वाढलेले कीटकनाशकांचे प्रमाण, फास्ट फूडचा अतिरेक हे कारण ठरू शकते.
भारतात स्तनाचा कर्करोग चाळिशीत होण्याचे प्रमाण पाश्चिमात्य देशांपेक्षा जास्त आहे. साधारण ३० टक्के रूग्ण ५० च्या आतील वयाचे आहेत. स्तनाची गाठ आढळून आली तरी बऱ्याचदा लज्जेस्तव अनेक तरुण महिला डॉक्टरांकडे उपचारासाठी वेळेवर जात नाहीत. याच कारणांमुळे कर्करोगाचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते. शासनाच्या महात्मा फुले आयुष्यमान भारत योजनेत कर्करोगावर पूर्ण उपचार मोफत होऊ शकतात.
शस्त्रक्रिया ही स्तनाच्या कर्करोगावरील महत्वाची उपचार पद्धती आहे. स्तन वाचवून देखील सुरक्षितपणे कॉस्मेटिक ऑपरेशन करता येऊ शकते. त्याचप्रमाणे कर्करोग पूर्णपणे बरा करण्यासाठी केमोथेरपी आणि रेडिओथेरपी देखील तितकीच महत्त्वाची आहे.
स्त्रियांनी स्वतः स्तन तपासणी नियमितपणे करावी. त्याचप्रमाणे चाळिशीनंतर वर्षात एकदा मेमॉग्राफी करावी. कोणतीही शंका वाटल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कर्करोग जेवढा लवकर ओळखून उपचार केले जातील तेवढे तो बरा होण्याचे प्रमाण वाढते.
-डॉ. श्रीनिकेतन काळे, सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, मिरज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.