

sakal
BREAST CANCER RISK FACTORS FOR YOUNG WOMEN: स्तनाचा कर्करोग हा प्रामुख्याने वाढत्या वयातील महिलांमध्ये आढळणारा आजार मानला जातो. मात्र, वयाव्यतिरिक्त आता आणखी एक महत्त्वाची बाब वैद्यकीय क्षेत्रासमोर येत आहे ती म्हणजे तरुण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण. भारतातील विविध अभ्यासांमधून ४५ वर्षांखालील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. या महिलांमध्ये निदान होण्यास होणारा विलंब आणि योग्य वेळी तपासणी न होणे हीदेखील महत्त्वाची आव्हाने आहेत.