Breastfeeding Week: स्तनदा मातांनी दारू पिल्याने बाळाच्या वाढीवर काय परिणाम होतो?

गरोदर महिलेनेसाठी दारु पिणे धोकादायक आहे
Breastfeeding Week
Breastfeeding WeekEsakal

Breastfeeding Week: 'जागतिक स्तनपान सप्ताह' हा एक कार्यक्रम आहे जो दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण 7 दिवस साजरा केला जातो. आठवडाभर चालणारा हा कार्यक्रम आई आणि मूल दोघांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. बाळासाठी आणि आईसाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे याविषयी संपूर्ण जगामध्ये जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात, बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी 27 लाख मुले कुपोषणाला बळी पडतात. आईचे दूध बाळासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते त्याच्या निरोगी वाढीस मदत करते. अनेकदा डॉक्टरांपासून ते आरोग्य तज्ज्ञांपर्यंत सहा महिने बाळाला फक्त आईचे दूध द्यावे, असे सांगितले जाते.आजच्या लेखात आपण स्तनदा मातांनी दारू पिल्याने बाळाच्या वाढीवर काय परिणाम होतो? याविषयी माहिती पाहणार आहोत.

गरोदर महिलेनेसाठी दारु पिणे धोकादायक आहे. या महिलेने मद्यपान केल्यावर ते मद्य लगेच रक्तात मिसळतं आणि गर्भाशयातल्या बाळापर्यंत पोहोचतं. आपण थोडंसंच मद्यपान कधी तरीच करतो, असा विचार करणं चुकीचं आहे. आईने ती गरोदर असताना दारू पिली तर बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होण्याची, मतीमंदत्वाची वा आक्रमक वृत्ती येण्याच अधिक शक्यता असते.

जितकं जास्त मद्य सेवन, तितकं बाळाचं नुकसान जास्त असतं. अगदी लहान प्रमाणात मद्यपान केलं तरी त्याचा गर्भायशातल्या बाळावर परिणाम होतोच. अशा वेळी महिलांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.मदयसेवन करणाऱ्या महिलेचं बाळ कमी वजनाचं असण्याची देखील शक्यता असते.

Breastfeeding Week
Breast Feeding : स्तनपानामुळे होतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी

डिलीव्हरीनंतरही मद्यपान सुरक्षित नाही. प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या 6.2% असेल तर डिलीव्हरी झाल्यानंतर मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या 31% आहे. बाळाची आई जे खाते वा पिते त्याचे अंश तिच्या दुधामध्ये येतात. जर आईने मद्यपान केलं तर ते तिच्या दुधापर्यंत पोहोचतं.

Breastfeeding Week
Benefits of breast feeding : स्तनपानाचं महत्व आणि फायदे

मद्यपान केल्यानंतरच्या 30 ते 90 मिनिटांमध्ये आईच्या दुधामध्ये अल्कोहोलचं प्रमाण सर्वाधिक असतं. मद्यपान केल्यानंतर पुढच्या 2 ते 3 तासांसाठी त्याचा प्रभाव आईच्या दुधात राहतो. मद्याच्य अंमलामुळे आईला बाळाच्या गरजा समजणं कठीण जातं. बाळाला वाढवण्यासाठीच्या तिच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो. आईने मद्यपान केलं असल्यास तिने बाळासोबत एकाच पलंगावर झोपणं योग्य नाही. मद्याच्या अंमलात आईला झोप लागल्यास बाळ आईच्या अंगाखाली येण्याची शक्यता असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com