Healthy Diet
sakal
मिताहारं व्रजेत् नित्यं, शीलं चोन्नतमन्वहम् ।
संयमाद् दीर्घमायुः स्यात्, रोगाणां च क्षयो भवेत् ॥”
(योगशास्त्र सांगते, जो माणूस मिताहारी, संयमी आणि शीलवान राहतो, त्याचे आयुष्य दीर्घ होते आणि त्याचे रोग नाहीसे होतात.)
भारतीय जीवनपद्धती नेहमीच संयम, साधेपणा आणि संतुलित आहारावर आधारित राहिली आहे. ऋषी-मुनी, तपस्वी आणि योगी या सर्वांनी हजारो वर्षांपूर्वीच आरोग्याचं रहस्य शोधलं होतं : ‘मिताहार’ म्हणजे आवश्यक तेवढंच; पण शुद्ध, पौष्टिक आणि सात्त्विक अन्न. त्यांच्या थाळीत होतं - ताजं धान्य, मूग-डाळ, भाज्या, ताक, दूध, फळं आणि स्वच्छ पाणी.