Intermittent Fasting for Diabetes: इंटरमिटंट फास्टिंगने टाइप 2 मधुमेह आटोक्यात येतो का? वाचा संशोधन काय सांगतंय

How does 16:8 fasting help in managing blood sugar levels: इंटरमिटंट फास्टिंगमुळे टाइप 2 मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे.
Intermittent Fasting for Type 2 Diabetes
Intermittent Fasting for Type 2 Diabetessakal
Updated on

थोडक्यात:

  1. इंटरमिटंट फास्टिंग ही ठराविक वेळेत खाण्याची आणि उर्वरित वेळ उपवास करण्याची सोपी आणि लवचिक पद्धत आहे.

  2. ही पद्धत वजन कमी करण्यास मदत करते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

  3. मधुमेह रुग्णांनी ही पद्धत अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Can intermittent fasting reverse type 2 diabetes naturally: अलीकडच्या काळात इंटरमिटंट फास्टिंग म्हणजेच ठराविक वेळेच्या कालावधीतच जेवण्याची आणि उर्वरित वेळेत उपवास ठेवण्याची पद्धत प्रसिद्ध झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण ही पद्धत अवलंबत आहेत, कारण ती सोपी, लवचिक आणि औषधांपेक्षा नैसर्गिक उपाय मानली जाते.

संशोधनांनुसार ही पद्धत इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, रक्तातील साखर कमी करते आणि काही रुग्णांमध्ये औषधांशिवायही साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटंट फास्टिंग (IF) ही एक खाण्याची विशिष्ट पद्धत आहे, ज्यामध्ये ठराविक वेळेत खाणे आणि उर्वरित वेळ उपवास करणे याचा समावेश असतो. पारंपरिक आहारापेक्षा ही पद्धत तुम्ही काय खाता यावर नव्हे, तर केव्हा खाता यावर लक्ष केंद्रित करते. या पद्धतीत जेवण ठराविक तासांच्या कालावधीत घेतले जाते आणि उर्वरित वेळ उपाशी राहिले जाते. यामुळे शरीर ग्लुकोजऐवजी साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरू लागते, जे आरोग्यदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.

Intermittent Fasting for Type 2 Diabetes
Itchy Pimples: पिंपल्सना सतत खाज सुटतेय? हे मुरूम नसून फंगल इन्फेक्शन असू शकतं! जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्सने फरक कसा ओळखायचा

काय सांगते संशोधन?

अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की इंटरमिटंट फास्टिंगमुळे वजन कमी होणे, HbA1c ची पातळी घटणे आणि शरीराचे चयापचय सुधारणे अशा सकारात्मक परिणामांची नोंद झाली आहे.

400 हून अधिक टाइप 2 मधुमेही रुग्णांवर करण्यात आलेल्या एका ट्रायलमध्ये, फास्टिंग करणाऱ्यांमध्ये औषध घेणाऱ्यांच्या तुलनेत रक्तातील साखर अधिक नियंत्रणात आल्याचे आढळले, तसेच त्यांचे वजन सरासरी 10 किलोने कमी झाले आणि रक्तदाब, कंबरेचा घेर व कोलेस्टेरॉलची पातळीही सुधारली.

चीनमध्ये झालेल्या एका छोट्या अभ्यासात इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे निम्मे रुग्ण औषधांशिवाय साखर नियंत्रणात ठेवू शकले, तर काही रुग्णांनी दीर्घकाळ इन्सुलिनवर असतानाही एका महिन्याच्या आत इन्सुलिन घेणे पूर्णपणे थांबवले.

Intermittent Fasting for Type 2 Diabetes
Belly Fat in Men: कॉर्पोरेट जीवनशैली आणि तणाव – पुरुषांमध्ये पोट सुटण्याची मुख्य कारणं! वजन नियंत्रणासाठी जाणून घ्या प्रभावी उपाय

ही पद्धत प्रभावी कशी ठरते?

  • इन्सुलिन प्रतिकार कमी होतो: इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीरात इन्सुलिनची पातळी घटते आणि पेशींमध्ये संवेदनशीलता वाढते

  • वाढलेली चरबी कमी होते: विशेषतः यकृत आणि पॅन्क्रिॲजभोवतीची चरबी कमी होऊन आरोग्य सुधारते

  • ऊर्जेचा स्त्रोत बदलतो: इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीर साखरेऐवजी चरबी आणि केटोनचा वापर करू लागतं

  • हार्मोनल समतोल: भूक आणि समाधान हे दोन्ही नियंत्रित ठेवणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन सुधारते

इंटरमिटंट फास्टिंग सुरू करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा:

  • डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्ही आधीच काही औषधे घेत असाल तर

  • ब्लड शुगर नियमित तपासा

  • 12:12 किंवा 14:10 यासारख्या सौम्य पद्धतीने सुरुवात करा

  • आहारात पोषक घटकांचा समावेश करा, जसे की फायबर, सत्वयुक्त चरबी, प्रथिनं आणि गुंतागुंतीचे कार्बोहायड्रेट्स

FAQs

  1. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय आहे? (What exactly is intermittent fasting?)

    इंटरमिटंट फास्टिंग ही खाण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये ठराविक वेळेत जेवण घेतले जाते आणि उर्वरित वेळ उपवास केला जातो. या पद्धतीत काय खाल्लं जातं यापेक्षा केव्हा खाल्लं जातं यावर भर असतो. उदाहरणार्थ, 12 तास खाणं आणि 12 तास उपवास (12:12) किंवा 14 तास उपवास आणि 10 तास खाणं (14:10) अशा वेळापत्रकानुसार जेवण घेतले जाते.

  2. मधुमेह रुग्णांसाठी ही पद्धत सुरक्षित आहे का? (Is intermittent fasting safe for diabetic patients?)

    हो, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही पद्धत अवलंबावी. काही मधुमेह रुग्णांमध्ये इंटरमिटंट फास्टिंगमुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मात्र आधीच औषधे किंवा इन्सुलिन घेत असाल, तर रक्तातील साखर खूपच कमी होण्याचा धोका राहतो. म्हणून नियमित तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

  3. इंटरमिटंट फास्टिंगचे आरोग्यावर कोणते फायदे होतात? (What are the health benefits of intermittent fasting?)

    वजन कमी होण्यास मदत होते, इन्सुलिन प्रतिकार कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते, शरीरातील अतिरिक्त चरबी विशेषतः यकृत आणि पॅन्क्रियाजभोवतीची चरबी कमी होते, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि चयापचय सुधारतो, हार्मोनल समतोल साधला जातो ज्यामुळे भूक आणि समाधान नियंत्रणात राहते.

  4. ही पद्धत सुरू करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? (What precautions should be taken before starting intermittent fasting?)

    डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सुरुवात करा, सुरुवातीला सौम्य पद्धत (12:12 किंवा 14:10) निवडा, रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा, आहारात पोषक घटकांचा समावेश करा – फायबर, प्रथिने, सत्वयुक्त चरबी आणि गुंतागुंतीचे कार्बोहायड्रेट्स यांचा समतोल साधा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com