

धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असतो. असं केल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यात वजन वाढणे ही समस्या सर्वसाधारण झाली आहे पण तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर गाजराचा ज्यूस तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. (Carrot Juice Benefits)
गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज आपण त्याचे अनेक फायदे जाणून घेणार आहोत.
गाजरामध्ये व्हिटामिन ए असते जे चेहऱ्यावर चमक आणते. याशिवाय चेहऱ्यावरील काळे डाग आणि मुरुम दूर करते.
गाजराचा ज्यूस पिल्याने डोळ्यांची दृष्टी उत्तम राहते.
रक्ताची कमतरता असलेल्यांनी गाजरचा ज्यूस अवश्य प्यावा. गाजर हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करते.
गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन असते जे तुम्हाला तणावमुक्त ठेवण्यासाठी मदत करते
गाजराच्या रसात कॅलरीज कमी असतात त्यामुळे गाजर वजन कमी करण्यास मदत करते आणि मेटाबॉलिज्म सुधारते.
गाजराच्या रसात कॅल्शियम, मॅग्निशियम आणि पोटॅशियम असते त्यामुळे गाजराचा ज्यूस गरोदरपणात अधिक फायदेशीर असतो.
गाजराचा ज्यूस पिल्याने पचनतंत्र सुधारते.
गाजराचा ज्यूस पिल्याने सर्दी खोकला होत नाही. घसाच्या आरोग्यासाठी ज्यूस फायदेशीर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.