

Cerebral Palsy Symptoms in Children: Causes, Signs & Treatment
esakal
Cerebral Palsy in Toddlers: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळा आणणारा 'सेरेब्रल पाल्सी' (Cerebral Palsy) हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. जगभरात लाखो लहान मुलं या समस्येनं बाधित आहेत. गर्भाशयात असताना मेंदूचा असामान्य विकास होणे, जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर लहान वयात मेंदूला लागलेली दुखापत यांमुळे हा विकार होतो.
मेंदूतील पेशींना इजा पोहोचल्यामुळे मुलांच्या स्नायूंमधील ताकद कमी होते आणि त्यांच्या हालचालींवर नियंत्रण राहत नाही. परिणामी, मुलांचे उठणे, बसणे, चालणे, बोलणे आणि शरीराचा समतोल राखणे कठीण होऊन बसते. वर्ल्ड सेरेब्रल पाल्सी दिवसानिमित्त या विकाराची मुख्य लक्षणे आणि त्यावरील उपायांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.