Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. भात खाल्ल्याने वजन वाढतं असा अनेकांचा गैरसमज आहे. तर काहींना चपाती खाल्लाने वजन वाढतं असं वाटतं. खाण्याबाबत कायमच लोकांचे गैरसमज असतात. पण तुम्हाला कदाचित ही माहिती वाचून आश्चर्यच वाटेल. तुम्हाला माहितीये काय? ही चपाती भात खाऊनही वजन कमी करता येईल. फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी.
भारतीय अन्नाचा मुख्य आहार म्हणजे चपाती आणि भात. दोन्हीमध्ये कर्बोदकं जास्त असतात. अशा परिस्थितीत, भात किंवा चपातीमध्ये काय चांगलं आहे हे तुम्ही ठरवू शकत नसाल, तर ही बातमी नक्की वाचा.
चपाती आणि भात खाल्ल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि ग्लुकोज शरीराला ऊर्जा देते. म्हणूनच चपाती आणि थोडा भात खाण्याचा सल्ला दिला जातो. भात आणि चपातीमध्ये फक्त कर्बोदके नसून त्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वं हे पोषक घटक देखील असतात.
वजन कमी करण्यासाठी काय उपयुक्त?
भात आणि चपाती यांच्यातील पौष्टिक घटकांचं मूल्य जवळपास सारखं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या आहारात याचा समावेश करु शकता. भातामध्ये चपातीपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स असते. भात खाल्ल्याने पोट लवकर भरत असलं तरी स्टार्चमुळे ते लवकर पचते. त्यामुळे पुन्हा भूक लागते.
दुसरीकडे चपातीमध्ये भातापेक्षा जास्त प्रोटीन आणि फायबर असतं, ज्यामुळे पोट थोडं जास्त काळ भरलेलं राहतं. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत चपातीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरससारखी खनिजं जास्त असतात. दोघांचा ग्लायकेमाइन इंडेक्स समान असतो. पौष्टिक मूल्य पाहता, तुम्ही चपातीला आहाराचा भाग बनवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. दरम्यान आपण भात किंवा चपाती यापैकी काहीही तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाऊ शकता. (Health)
गव्हाच्या पिठात काय काय असतं?
76 ग्रॅम कार्बोहायड्रेट
10 ग्रॅम प्रोटीन
1 ग्रॅम फॅट्स
100 ग्रॅम तांदळात काय काय असतं?
28 ग्रॅम कर्बोदक
2.7 ग्रॅम प्रथिने
0.3 ग्रॅम चरबी (Weight Loss)
डिस्केलमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.