अष्टांग आयुर्वेदापैकी बाल अर्थात कौमारभृत्यतंत्रामध्ये लहान मुलांच्या रोगांसंबंधी, त्यांच्या एकूणच वाढीसंबंधी, त्यांच्या एकूणच औषधयोजनेसंबंधी मार्गदर्शन केलेले सापडते.
बाल म्हणजे बालक आणि ग्रह म्हणजे ग्रासणे, पकडणे, बाधित होणे. ज्यामुळे बालक व्याधीने ग्रासले जाते, ज्यामुळे बालकाच्या आरोग्यावर बाधा येते ते बालग्रह होत. बालग्रह हा केवळ एक रोग नाही तर बालग्रहाच्या अंतर्गत नेमके कारण लक्षात न येणारे अनेक रोग येतात.