मुलांच्या भावनिक विकासासाठी तुम्ही काय करता ? बुद्ध्यांकापेक्षा महत्त्वाचा आहे भावनांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

emotional quotient

मुलांच्या भावनिक विकासासाठी तुम्ही काय करता ? बुद्ध्यांकापेक्षा महत्त्वाचा आहे भावनांक

मुंबई : पालक बनल्यानंतर आपल्या आयुष्यातले प्राधान्यक्रम बदलतात. आपले आयुष्य केवळ मुलांभोवती फिरू लागते. बऱ्याचदा पालक आपल्या मुलांच्या शारीरिक सुदृढतेकडे लक्ष देतात; पण मानसिक सुदृढताही तितकीच महत्त्वाची असते.

हेही वाचा: मुलांचं किशोरवय हाताळताना....

मानसिक सुदृढतेचे महत्त्व पालकांनी समजून घेतले पाहिजे. तसेच मानसिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी समजून घेतल्या पाहिजेत. तुम्हाला स्वत:ला लहानपणी मानसिक आधार मिळाला नसेल तर ही गोष्ट तुमच्या मुलांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरते. म्हणूनच मुलांच्या मनोविकासासाठीचे मार्ग जाणून घेऊ या.....

हेही वाचा: ‘डिजिटल डिटॉक्स’ची वाढती गरज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यकता

भावनांक (emotional intelligence) म्हणजे काय ?

आपल्या भावना व्यक्त करणे, त्यांवर नियंत्रण ठेवणे आणि समजून घेणे याला भावनांक म्हणतात. यात इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे, त्या समजून घेणे यांचाही समावेश होतो. सर्वप्रथम १९५० साली मानसशास्त्रज्ञ अब्राहत मॅसेलोने मानसिक सक्षमतेचे महत्त्व ओळखले.

स्वत:पासून सुरुवात करा

मुलांना मानसिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आधी पालकांची मन:स्थिती स्थिर असणे आवश्यक आहे. स्वत:चे मन स्थिर केल्यानंतरच पालक मुलांना भावनिकदृष्ट्या बळकट करू शकतात.

हेही वाचा: सकाळी सकाळी ऐका निर्सगातील आवाज! सुधारेल मानसिक आरोग्य

सहानुभूती

मुलांना इतरांविषयी सहानुभूती बाळगायला शिकवा. कोणी कष्ट घेत असेल किंवा कठीण परिस्थितीतून जात असल्यास त्याला मदत करण्याची सवय मुलांना लावा. यासाठी प्रत्यक्ष आयुष्यातल्या उदाहरणांचा आधार घ्या.

स्वत: बना आदर्श

मुले आपल्या पालकांकडे बघून शिकत असतात. त्यामुळे पालक म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर चांगले वागणे अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कसे वागता यातून मुलांचे वर्तन घडत जाते.

सामाजिक कौशल्य

पालक आपल्या मित्रमैत्रिणींशी कसे वागतात, बोलतात याकडे मुलांचे लक्ष असते. त्यांना सामाजिक कौशल्ये, कौटुंबिक मूल्ये, चूक-बरोबर यांतील फरक, इत्यादी गोष्टी शिकवा.

पुस्तकांची मदत घ्या

पुस्तकात मुलांना विविध प्रसंग मिळतील. प्रत्येक स्थितीत कशी प्रतिक्रिया द्यावी याची समज मुलांमध्ये विकसित होईल.

Web Title: Emotional Quotient Is Important Than Intelligent Quotient Tips For Developing Emotional Quotient In Children

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Childrens Day
go to top