वाढत्या उन्हापासून बाळाला कसे सुरक्षित ठेवाल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baby

वाढत्या उन्हापासून बाळाला कसे सुरक्षित ठेवाल ?

मुंबई : दिवसेंदिवस वाढणारा उष्मा प्रौढांनाही अस्वस्थ करत आहे; मग यात लहान मुलांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतो. लहान बाळांची त्वचा अतिशय नाजूक असल्याने त्यांनी अधिक त्रास होतो. त्यामुळे आता जाणून घेऊ या तुमच्या बाळाचे उन्हापासून संरक्षण कसे कराल ?

उन्हापासून दूर ठेवा

६ महिन्यांपेक्षा लहान बाळाला उन्हात नेऊ नका. कडक ऊन पडले असताना बाळाला घरातच ठेवा. जन्मत: बाळाला कावीळ झाल्यास रोज १५ मिनिटे त्याला उन्हात नेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. असे केल्याने कावीळसाठी जबाबदार असलेला बिलरुबीन हा घटक विरघळतो. परंतु, सकाळी ९ वाजण्याआधी आणि दुपारी ४ वाजल्यानंतरच बाळाला उन्हात न्यावे. कारण या वेळेत सूर्यकिरणे कमी हानीकारक असतात.

हेही वाचा: मुलांचं किशोरवय हाताळताना....

बाळाचे कपडे

उन्हात जाताना बाळाला अंगभर आणि सुती कपडे घालावेत.

सनस्क्रीन

बाळाला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या लोशनचा वापर करा. बाळाला कोणतीही सनस्क्रीन लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येक मुलाची त्वचा वेगवेगळी असते. त्वचा अधिक संवेदनशील असल्यास त्रास होऊ शकतो.

हेही वाचा: पिशवीतील पाणी... गुंतागुंंतीची शस्त्रक्रिया करुन बाळ अन् आईला वाचवले

सनबर्न झाल्यास

बाळाच्या त्वचेवर उन्हाचा परिणाम झाल्यास लालसर पुरळ उठेल. असे झाल्यास थंड पाण्यात भिजवलेले कापड बाळाच्या त्वचेवर लावून ठेवा. यामुळे त्वचेतील उष्णता निघून जाईल. अशावेळी त्वचेवर तेल-तूप लावणे टाळावे. कारण, यामुळे उष्णता त्वचेमध्ये साचून राहाते.

Web Title: How To Protect Your Baby From Increasing Woon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :baby care
go to top