तन्वीच्या संघर्षाला हवाय मदतीचा हात

तन्वी जन्मतःच कर्णबधिर होती. तिला ऐकू येण्यासाठी तिच्या वडिलांनी अनेक रुग्णालयांमध्ये उपचार होण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी तन्वी चार वर्षांची असताना मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात तिच्यावर कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया झाली.
cochlear implant surgery of tanvi kakade sakal foundation
cochlear implant surgery of tanvi kakade sakal foundationSakal
Updated on

तन्वी जन्मतःच कर्णबधिर होती. तिला ऐकू येण्यासाठी तिच्या वडिलांनी अनेक रुग्णालयांमध्ये उपचार होण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी तन्वी चार वर्षांची असताना मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात तिच्यावर कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी जवळपास साडेसहा लाख रुपयांचा खर्च आला होता.

तन्वीचे वडील बळीराम काकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम करतात. त्यांचे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती नाजूक होती. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारे साडेसहा लाख रुपये त्यांनी विविध स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींकडून निधी मिळवून उभे केले होते.

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर व स्पीच थेरपीच्या सरावानंतर गेल्या १० वर्षांत तन्वीमध्ये खूप सुधारणा झाली होती. तिला पूर्णपणे ऐकू येऊ लागले, स्पष्ट बोलता येऊ लागले व ती सामान्य मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागली. दरम्यान, गेल्या महिन्यात अचानक तन्वीला पूर्णपणे ऐकू येण्याचे बंद झाले.

रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, की अंतर्गत कॉक्लिअर इम्प्लांट व्यवस्थित असून, कानाच्या बाहेरील ‘न्यूक्लेअस एट साउंड प्रोसेसर’ ही मशीन खराब झाली आहे. त्यामुळे तिला ऐकू येत नाही. तिला पुन्हा ऐकू येण्यासाठी नवीन मशीन बसवावे लागणार असून, त्यासाठी जवळपास साडेसात लाख रुपये खर्च आहे.

बळीराम काकडे आपल्या पेपर टाकण्याच्या कामातून महिना २० हजार रुपये कमावतात. त्यातील घराचा हप्ता, घरखर्च व मुलीच्या शिक्षणाचा खर्च जाऊन शिल्लक काही राहत नाही. काकडे हे आपल्या मुलीला पुन्हा सर्वसामान्य मुलांप्रमाणे बोलता व ऐकता यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी मित्रमंडळी व नातेवाइकांकडून आतापर्यंत एक लाख ५० हजार रुपये जमविले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी ते विविध संस्था व दानशूर व्यक्तींना भेटून आर्थिक मदतीसाठी आवाहन करत आहेत.

‘सोशल फॉर ॲक्शन’च्या माध्यमातून २० संस्थांना मदत

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी डिजिटल वेबसाइट स्वरूपात प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांशी निगडित असलेल्या समस्या लोकसहभागाच्या व कंपनी ‘सीएसआर’च्या सहकार्याने दूर करून ग्रामविकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

याशिवाय व्यक्तिगत देणगीदार आणि सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) स्वीकारणाऱ्या आस्थापनांना एकत्र आणून महाराष्ट्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमांना निधी उपल्बध करून देण्यासाठी अभियान राबविण्यात येते.

अडीच वर्षांत ‘सोशल फॉर ॲक्शन’मार्फत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या २० स्वयंसेवी संस्थांचे व चार गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदतीसाठीचे अभियान पूर्ण केले आहे. तसेच, क्राउड फंडिंगद्वारे जमा झालेला निधी त्या-त्या संस्थांना वर्ग केला आहे.

शांभवीवर यशस्वी शस्त्रक्रिया

शांभवी साठे या सात वर्षीय जन्मजात कर्णबधिर मुलीला ऐकू येण्यासाठी करण्यात येणाऱ्या कॉक्लिअर इम्प्लांट या शस्त्रक्रियेच्या आठ लाख रुपयांच्या खर्चासाठी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या ‘सोशल फॉर ॲक्शन’च्या माध्यमातून अभियान राबवून सामूहिक मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते.

त्याला दानशूर व्यक्तींनी चांगला प्रतिसाद दिला होता. यामध्ये शांभवीच्या कुटुंबीयांनी जमा केलेला, विविध संस्थांकडून मिळालेला व ‘सोशल फॉर ॲक्शन’च्या अभियानातून जमा झालेला सर्व निधी शस्त्रक्रियेसाठी वर्ग केला होता. शांभवीवर कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, तिच्यात सुधारणा होत आहे.

अशी करा मदत

‘सोशल फॉर ॲक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर तन्वी काकडे या मुलीची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन तन्वी काकडे हिची माहिती घेऊन, डोनेट नाऊ या बटनावर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

किंवा

खालील बँक खात्यात ऑनलाइन देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सॲप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.

Name: Sakal Social Foundation

Bank Account No: ४५९१०४००००२१२५२

Name of Bank:

IDBI bank, Laxmi Road, Pune

IFSC Code: IBKL००००४५९

टीम : SFA

support@socialforaction.com

संपर्क : ८६०५०१७३६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com