Autistic Child
Autistic Childgoogle

Autistic Child : मुलांच्या साध्या वाटणाऱ्या या सवयी असू शकतात 'स्वमग्नते'ची लक्षणे

स्वमग्नतेचे वेळीच निदान होणे व वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्याआधी जाणून घेऊ या स्वमग्नता म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय आहेत.
Published on

मुंबई : घरात बोलकी-बडबडी अशी भरपूर माणसं आहेत, सोसायटीत खेळायलाही भरपूर मुलं आहेत; पण तरीही तुमचं ३-४ वर्षांचं मूल बोलत नाही. त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखं वागत नाही. असं असेल तर वेळीच मुलाकडे लक्ष द्या.

ही अशी लक्षणे असलेल्या मुलांमध्ये 'स्वमग्नता' (autism) ही समस्या असल्याचे बहुतांश वेळा दिसते. कोरोनामध्ये मुलांच्या सामाजिक आयुष्यावर बंधनं आली. अशा स्थितीत मुलं अधिकाधिक आत्मकेंद्री बनत गेली व बऱ्याच मुलांमध्ये स्वमग्नतेची लक्षणे दिसू लागली.

स्वमग्नतेचे वेळीच निदान होणे व वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्याआधी जाणून घेऊ या स्वमग्नता म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय आहेत. हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते ?

Autistic Child
Gaming Career : गेमिंग आवडतंय ना ? मग तुम्हाला मिळू शकते लाखो रुपये देणारी नोकरी

स्वमग्ननता किंवा ऑटिझम असलेल्या मुलांना इतरांशी संवाद साधणे, लेखन-वाचन आणि समाजात मिसळणे या कृती करण्यात अडचणी येतात. अशा मुलांचा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करत असतो.

स्वमग्न मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. पण काही लक्षणे बहुतांश मुलांमध्ये सारखी असतात. (symptoms of autism in marathi)

लक्षणे

१. बोलता किंवा संवाद साधता न येणे

स्वमग्न मुले ३ ते ४ वर्षांची झाल्यानंतर पुरेसं बोलू शकत नाहीत. जाणीवपूर्वक बोलायला शिकवल्यानंतरही एक-दोन शब्दोच्चारांच्या पलीकडे त्यांची मजल जात नाही. अनेकदा इतरांनी बोललेले मुलं ऐकून घेतात पण त्याला प्रतिसाद देत नाहीत.

२. तेच-ते बडबडत राहाणे

बऱ्याचदा मुलं एकच गोष्ट दिवसभर बडबडत राहतात. काही वेळा आरडा-ओरडा करतात. तोंडातल्या-तोंडात बोलतात. त्यांचे बोलणे कळत नाही.

Autistic Child
Parenting Tips : पालकांनी मुलांना ही कौशल्ये नक्की शिकवावीत

३. खाण्या-पिण्याच्या सवयी

अनेकदा मुले नीट जेवत नाहीत. ठरावीक पदार्थ खाणेच पसंत करतात.

४. विचित्र हालचाली

मुलं विनाकारण उड्या मारणे, डोळे मिचकावणे, डोकं आपटणे अशा गोष्टी करत राहतात. ही कामे मुले काही तासांपर्यंतही करू शकतात. आनंद झाल्यावर किंवा राग आल्यावर दात विचकतात.

५. झोप न येणे

दिवसभर उड्या मारूनही मुलांना रात्री झोप येत नाही. झोप येऊनही त्यांना शांत झोप लागत नाही. मुलं रात्रभर जागी राहतात.

सूचना - हा लेख सामान्य माहितीसाठी आहे. या विषयासंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com