Coronavirus : BF.7 करोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणे

चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे Omicron BF.7 आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव BA.5.2.1.7 आहे आणि तो Omicron BA.5 चे उप-प्रकार आहे.
Coronavirus BF.7
Coronavirus BF.7google

सध्या Omicron BF.7 चीनमध्ये धुमाकूळ घालत आहे. कोविड-19 संसर्गास कारणीभूत असलेल्या कोरोना विषाणूचे 2020 पासून अनेक वेळा उत्परिवर्तन (Mutations) झाले आहेl.

प्रत्येक नवीन व्हेरिएंटने जुन्या व्हेरिएंटला मागे टाकले आणि लोक याला बळी ठरले. चीनमधील कोरोनाच्या नवीन प्रकरणांच्या मागे Omicron BF.7 आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव BA.5.2.1.7 असून तो Omicron BA.5 चा उप-प्रकार आहे.

हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Coronavirus BF.7
Corona : कोरोनाची लाट पुन्हा येणार ? ही आहेत विषाणूच्या नव्या प्रकाराची लक्षणे

BF.7 मध्ये संसर्ग वेगाने पसरण्याची क्षमता आहे

चीनमधील कोविडच्या परिस्थितीवरून हे स्पष्ट झाले आहे की, BF.7 तिथल्या लोकांमध्ये वेगाने संसर्ग पसरत आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार , Omicron BF.7 मध्ये लोकांना त्वरीत शिकार बनवण्याची क्षमता आहे, ज्याची लक्षणे देखील संसर्ग झाल्यानंतर लवकर दिसून येतात, ज्यामुळे लोक सहजपणे संक्रमित होतात.

BF.7 शी संबंधित लक्षणे

BF.7 व्हेरिएंट श्वसन प्रणालीच्या वरच्या भागाला संक्रमित करतो. त्यामुळे खालील लक्षणे दिसतात.

  • ताप

  • खोकला

  • घसा खवखवणे

  • सर्दी

  • अशक्तपणा

  • थकवा

  • काही लोकांना उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे देखील जाणवतात.

कोरोनाच्या इतर प्रकारांप्रमाणे, BF.7 मुळे देखील फक्त असेच लोक बळी ठरतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे.

इंग्लंडमध्येही वाढतायत कोविडची प्रकरणे

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजल्याच्या बातम्या समोर येत असतानाच यूकेच्या अनेक भागांमध्ये देखील कोविड-19 संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला प्रकरणे 13 लाखांवर पोहोचली होती. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा अजूनही कमी आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या 10 सर्वात सामान्य लक्षणांच्या यादीतही बदल करण्यात आले आहेत. आता जाणून घेऊया कोविडची सामान्य लक्षणे कोणती आहेत.

इंग्लंडमध्ये ऑक्टोबरच्या अखेरीस कोविडची प्रकरणे वाढू लागली, तर स्कॉटलंड आणि वेल्समध्येही प्रकरणे वाढत असल्याचे दिसून आले. दरम्यान, ZOE आरोग्य अभ्यास सतत कोविडच्या लक्षणांचा मागोवा घेत होता.

Coronavirus BF.7
मुलांमधील long covidपासून राहा सावध ! अशी आहेत लक्षणे

कोविड-19 ची ही आहेत नवीन सामान्य लक्षणे

घसा खवखवणे हे या वेळी सर्वात सामान्यपणे नोंदवलेले लक्षण आहे, त्यानंतर नाक वाहणे, नाक बंद होणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, श्लेष्मासह खोकला, स्नायू दुखणे आणि वेदना.

वास कमी होणे, ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही पारंपरिक लक्षणे आता कमी झाली आहेत. कोविड-19 च्या लक्षणांच्या यादीत एनोस्मिया म्हणजेच वास न येणे हे 14 व्या स्थानावर आहे आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे 16 व्या स्थानावर आहे. वास कमी होणे हे कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक सामान्य लक्षण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com