Salt In Daily Diet: रोज आहारात किती मीठ असावं? जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं मीठ ठरेल बेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salt In Daily Diet

Salt In Daily Diet: रोज आहारात किती मीठ असावं? जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं मीठ ठरेल बेस्ट

Health Tips: मीठ हे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असून आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या खाण्यात मीठ असतेच. मिठाची कमतरता झाल्यास पेशींचे कार्य सुरळीत होत नाही. पेशींच्या योग्य कार्य आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन तसंच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडियम आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया तुमच्या आरोग्यानुसार तुमच्या शरीरासाठी कोणतं मीठ बेस्ट ठरेल ते.

मीठ शरीरातील 90 टक्के सोडियमची कमतरता पूर्ण करते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ आहारात घ्यायला हवे.

अतिप्रमाणात आहारात मीठ असल्याचे तोटे

अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. हृदयविकार, जठराचा कँसर, मेंदूतील रक्तप्रवाह कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

सोडियम कमी असणारे मीठ

प्रत्येक घरांत जवळपास प्रत्येक पदार्थांमध्ये मीठ वापरले जाते. मीठामध्ये 97 ते 99 टक्के सोडियम क्लोराईड असतं.

शरीरासाठी उत्तम मीठ कोणतं?

सागरी मीठ

खारट समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन करून तयार केल्याने क्षार परिष्कृत होत नाहीत. याशिवाय यामध्ये भरपूर आयोडीन असतं जे शरीरासाठी चांगलं मानलं जातं. समुद्री मीठामध्ये सामान्य मिठाच्या तुलनेत 10% कमी सोडियम असते. (Health)

रॉक सॉल्ट

हिमालयातून काढलेल्या मीठामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असलं तरी यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचं प्रमाण योग्य असतं.

सेल्टिक मीठ

राखाडी मिठात सोडियमचं प्रमाण कमी असतं. या मीठामध्ये इतर खनिजं आणि क्षारांचं प्रमाण योग्य असतं. हे मीठ इतकं नैसर्गिक असतं की त्यात कोणतीही भेसळ नसते.

कमी सोडियम असलेलं मीठ खावं की नाही?

कमी सोडियम असलेल्या मीठाचं पॅकेट बाजारात उपलब्ध असतं. या मिठात सोडियमचं प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी असतं. पोटॅशियम सॉल्टच्या नावाने उपलब्ध असलेल्या मिठामध्ये सोडियम प्रमाण नसतं. ज्यांना सोडियम खाण्यास मनाई आहे अशा व्यक्तींनी या मिठाचं सेवन करावं.